Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी महाविद्यालयात स्पोर्ट्स डे साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात दिनांक २९/९/२०२४ ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल स्पोर्ट्स डे साजरा करण्यात आला. अलीकडे विद्यार्थी खेळापासून दूर होताना दिसत आहे. खेळ हे व्यक्तीच्या जीवनात शारीरिक विकासासोबतच मानसिक शक्ती मजबूत बनवण्याचे कार्य करीत असतात.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शारीरिक व खेळ विभाग कार्य करीत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या एक खेळ खेळण्याची सवय असावी. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देव सर व महाविद्यालयाचे शारीरिक निर्देशक व खेळ विभागाचे प्राध्यापक अनिस खान सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वानखेडे सर व आभार प्रदर्शन प्रा. चटारे सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये