Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतातील नाली फोडण्यावरून झालेल्या वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी

2 आरोपीवर गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शेतातील नाली फोडण्याच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना तालुक्यांतील मेव्हणा राजा येथे 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता घडली, पोलिसांनी 2आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की फिर्यादी मुकुंद कुळकर्णी हे शेतामध्ये चक्कर मारायला गेले असता त्यांचे शेतातील नाली फोडुन त्यांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी येत असल्याने त्यांनी आरोपी कैलास चाटे, व सरस्वती चाटे यांना विचारणा केली असता,

आरोपिनी त्यांना शिविगाळ करुन काठीने डाव्या डोळ्याच्या खाली पाठीवर व डोक्यावर मारहाण करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या, घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सतिष नागरे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये