Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्विफ्ट कारसह एक पिस्टल अग्निशस्त्र जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 28/08/2024 रोजी आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अँटी गँग सेल व एक पथकातर्फे पंचासह अवैध धंद्यावर कारवाईची मोहिम राबवून पो.स्टे. रामनगर हद्दीत पेट्रोलिंग करित असताना मुखबीरचे खबरेवरून यातील नमुद आरोपी मोणु खान हा त्याचे साथीदार सह स्विफ्ट कार नी त्याचेजवळ एक पिस्टल अग्नि शस्त्र बाळगून कोणता तरी दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करण्याचे इराद्याने मारुती बुवा समाधी जुनी माढा कॉलनी वर्धा येथे येत असल्याची माहितीवरून पंचासह नाकेबंदी करून घेराव घालून सदर कार ची पाहणी केली असता आरोपी1) मोहिन खान उर्फ मोनु मेहबूब खान वय 31 रा. नालवाडी वर्धा, 2) साहिल प्रमोद बिडवाईक वय 20 रा खडकी सेलू, 3) बादल शिव चरण साहू वय 30 रा. रामनगर वर्धा, 4) कुणाल सुरेश इखार वय 32 रा रामनगर वर्धा हे मिळुन आले सर्वांची अंगझडती घेतली असता आरोपी मोनु खान चे अंगझडतीत कमरेत एक अग्नि शस्त्र मॅगझींन व मोबाईल मिळून आल्याने आरोपितांचे त्यांचे ताब्यातून जप्त मुद्देमाल1) एक पिस्तल अग्निशात्र मॅगझिन सह की 50,000 रू. 2) एक मोबाईल, की 10,000 रू, 3) एक स्विफ्ट कार क्रं MH 04 HF 1204 की 5,00,000 रू असा जु की 5,60,000 /- रुपये जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त केला. आरोपी मोनू खान याला अग्नि शस्त्र कुठून आणले याबाबत विचारपूस केली असता त्याने आरोपी 5) आनंद ठाकूर रा मानेवाडा नागपूर पसार याचेकडून विकत आणल्याची माहिती दिली त्यावरून सर्व आरोपीविरूध्द पो.स्टे. रामनगर येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीतांना पुढील कारवाई करीता सुरक्षित ताब्यात दिले.

 सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. विनोद चौधरी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि सलाम कुरेशी, पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप,रितेश शर्मा, पोलीस अंमलदार अमोल नगराळे, मनिष कांबळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे, दिपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये