Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फिर्यादीची फसवणुक – सायबर काईम रिपोर्टींग पोर्टलवर तक्रार

एकुण २ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी श्री. गौरव तपन ब‌ट्टोपाध्याय, रा. आलोडी, वर्धा यांनी दि. २२.१२.२०२३ रोजी त्यांचे फेसबुक वर इंटेरीयर फर्निचर डेकोरेशन ची जाहीरात पाहुन नागपुर येथील फ्लॅट करीता फर्निचर बनवायचे असल्याने फिर्यादी यांनी त्यावर दिलेल्या मो.क. वर संपर्क केला. फिर्यादी यांना व्हॉट्स अॅप्स वर लिंक प्राप्त झाली. त्याव्दारे इंटेरीयर फर्निचर चे काम केलेल्या साईटचे काम पाहल्यानंतर फिर्यादीना त्यावर विश्वास झाला.

त्यानंतर दि. २८.०२.२०२४ रोजी फिर्यादींचे मोबाईलवर कॉल आला. सदर मो.क धारकाने फर्नीचरचे कामाकरीता बुकींगचे २५,०००/- रू भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांना प्राप्त लिंक वर यु.पी.आय. व्दारे २५,०००/- रू पाठविले.

दि. ०४.०३.२०२४ रोजी फिर्यादी यांना कॉल करून फर्नीचरचे मोजमाप करीता नागपुर येथे येत असल्याचे सांगितले. व नागपुर येथे राहुल नावाचे व्यक्तीने फिर्यादीचे फलॅटवर फर्नीचर संबंधाने मोजमाप करून फर्निचरचे एकुण २,६५,९६६/- रू. होईल असे सांगितले होते. त्याअन्वये फिर्यादी यांनी दि. ०५.०३.२०२४ रोजी २८.१९३/- रू दि. १३.०३.२४ रोजी ६६,४९१/- रू व दि. १५.०५.२०२४ रोजी ६६,४९२/- रू यापमाणे एकुण १,८६,१७६/- रू ऑनलाईन पाठविले. परंतु रक्कम पाठविल्यानंतरही काम सुरू न झाल्याने फिर्यादी यांनी वारंवार कॉल केले असता कसल्याही प्रकारे प्रतिसाद देत नसल्याने फर्निचर बनवायचे नावाखाली फसवणुक झाल्याचे फिर्यादीचे निदर्शनास आल्याने नॅशनल सायबर काईम रिपोर्टींग पोर्टल वर तक्रार केली असता २८,२१४/- रू रक्कम होल्ड झाली. याप्रमाणे एकुण १,५७,९६२/- रू फसवणुक झाल्याचे फिर्यादीचे तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषणावरून गुन्हयात आरोपी ०१) राहुल लक्ष्मण देव, वय ३१ वर्षे, कुणाल आयकोनीया, मामोर्डी पुणे, व ०२) अभिषेक यशवंत बोरडे, वय २३ वर्षे, रा. पिंपरी, सांडस, गणपती मंदीर, ता. हवेली, जि. पुणे यांना दि. २४.०८.२०२४ रोजी गुन्हयात अटक करून आरोपींचा दि. २८.०८.२०२४ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त केला होता. त्यादरम्यान आरोपींना पुणे येथे नेवुन गुन्हयाचा तपास करण्यात आला. आरोपीकडुन गुन्हयात ०४ मोबाईल एकुण १,१०,०००/- रू व नगदी १,५८,०००/- रू असा एकुण २,६८०००/- रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहे.

गुन्हयात अटक आरोपीवर पुणे येथील विमानतळ पोलीस स्टेशन, व वानवाडी पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती प्राप्त असुन याबाबत संबंधीत पोलीस स्टेशन यांना संपर्क करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थागुशा/सायबर पो.स्टे., श्री. शिवराज कदम, पो.उप.निरीक्षक, पो.स्टे. सेवाग्राम, पो.हवा./निलेश तेलरांधे, अनुप राऊत, अमित शुक्ला, वैभव क‌ट्टोजवार, रणजित जाधव, पो.शि./ पवन झाडे, लेखा राठोड, प्रतिक वांदोले, यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये