Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित

शिक्षक परिषदेचा दणका

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्ह्यातील तत्कालीन शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्यामुळे शासनाने त्यांना निलंबित केले आहे.

श्रीमती कल्पना चव्हाण यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मागील अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तर्फे , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार व राज्य कार्याध्यक्ष श्री नागो गाणार सर यांच्या नेतृत्वात अनेक निवेदने सरकारला देण्यात आली व चव्हाण यांच्या बरखास्ततीसाठी चंद्रपूरला धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले.

तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची कारकीर्द ही भ्रष्टाचारी असल्यामुळे त्याचे सबळ पुरावे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शासन दरबारी जमा केले.

 विशेष बाब म्हणून अल्पसंख्याक शाळेतील 40 पदांची अवैद्य मान्यता देण्याचा प्रकार, तसेच शिक्षक पदाधिकारी माननीय रामदास गिरटकर सर यांच्यावर खोटारडे आरोप करण्याचा प्रकार त्यांना भोवला.

शिक्षण विभागातील दलालाच्या माध्यमातून पैसे गोळा करणे यात सत्यता असल्याचे शासनाला कळल्यामुळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सततच्या पाठपुराव्याने अखेर तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना पायउतार व्हावे लागले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार सर, नागपूर विभागाचे उपाध्यक्ष मधुकर मुपीडवार ,विनोद पांढरे, संघटन मंत्री रामदास गिरटकर ,चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष विलास खोंड, कार्यवाह दिलीप मेकेलवर, शहर अध्यक्ष संजय कांचनलावार, कार्यवाह वसंत वडस्कर कॉन्व्हेंट विभाग प्रमुख विवेक आंबेकर तालुका अध्यक्ष देविदास चौले व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे असंख्य सदस्य कार्यकर्त्यांनी वेळोवेळी निवेदने देऊन व आंदोलने करून चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या निलंबनाची मागणी केली होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये