Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली येथे नाम.धर्मराव बाबा आत्राम यांची आढावा बैठक संपन्न

शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे दिले निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

          बदलापूर सारखी दुर्देवी घटना आपल्या तालुक्यात घडू नये यासाठी दक्षता घेणे आवश्यक असून तालुक्यातील सर्व शासकीय ,निमशासकीय वरिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या नियमानुसार सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले आहेत. सावली तालुक्यातील कामकाजाचा आढावा तहसील कार्यालयाच्या भवनात घेतला त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी तहसीलदार,बीडीओ,पोलीस अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी नामदार आत्राम यांनी पुढे बोलताना असे सांगितले की शाळेच्या ५०० चे मीटर परिसरात पान टपऱ्यांना प्रतिबंध असून याबाबतच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत शाळेतील बालकांची योग्य पोषण व्हावे म्हणून शासनाने पोषण आहार योजना सुरू केली आहे त्यांच्यासाठी मिळालेले धान्य सू व्यवस्थित ठेवण्यात आले आहे का त्याचा योग्य वापर होतो काय याबाबत केंद्रप्रमुख आणि शिक्षण अधिकारी तसेच गट शिक्षण अधिकारी यांनी विविध शाळेला नियमित भेटी देऊन तपासणी करण्याचे ही मंत्री आत्राम यांनी सांगितले,आरोग्य विभागाच्या आढावा घेताना सर्व शासकीय रुग्णालयात स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे व त्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे सूचना दिल्या.

याप्रसंगी ब्रम्हपुरी विधानसभा प्रमुख दिवाकर निकूरे,रवी वासेकर,सावली तालुकाध्यक्ष घनश्याम राऊत,जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते आढावा बैठक संपन्न होताच जनसंवाद मेळावा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित केला होता.याप्रसंगी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले महायुती सरकारने राबविण्यात येत असलेल्या योजनेचे तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी प्रसार व प्रचार केला पाहिजे लाडक्या बहिणी योजनेमुळे गोरगरीब जनतेला महायुती सरकारने योग्य न्याय दिलेला आहे जनसंपर्क या कार्यालयातून जनतेचे लोक कल्याण कार्य झाले पाहिजेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये