Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील नागरी वस्तीतून जाणरी धोकादायक 33 के. व्ही.विद्युत वाहिनी स्तलांतरित करा

राष्ट्रवादीचे उपकार्यकारी अभियंत्यास निवेदन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       शहरातील त्रिंबक नगर भागातून स्थानिक नागरिकांच्या घरावरून 33 के. व्ही. विद्युत वाहिनी गेली असून नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. या धोकादायक विद्युत वाहिनीमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर विद्युत वाहिनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी. अशी मागणी महावितरण चे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्थानिक नागरिकांनी केली आहे.

     राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,देऊळगाव राजा शहरातील त्र्यंबक नगर या नागरी वस्तीतून नागरिकांच्या घरावरून धोकादायक 33 के. व्ही. विद्युत वाहिनी गेलेली आहे. सदर 33 के. व्ही.विद्युत वाहिनी गिरोली सब स्टेशन ते प्रगती जिनिंग ते कृषी उत्पन्न बाजार समिती मधून देऊळगाव राजा स्टेशनला आलेली आहे. ज्या मार्गाने ही विद्युत वाहिनी गेलेली आहे त्या मार्गामध्ये नागरिकांची घरे, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल ( लहान मुलांची शाळा)असल्याने या विद्युत वाहिनी पासून नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. ही विद्युत वाहिनी नागरिकांच्या घरावरून काही फुटाच्या अंतरावर असल्याने भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या विद्युत वाहिनीची महावितरण कार्यालयाने तात्काळ स्थळ पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच भविष्यात या विद्युत वाहिनीमुळे मोठा अपघात होऊ नये म्हणून सदर 33 के. व्ही. विद्युत वाहिनी स्थलांतरित(शिपटिंग)करण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे पाटील, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, रवींद्र इंगळे, संतोष शिंगणे, यांच्यासह राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलचे संचालक प्रणव लंबे, प्रगती जिनिंग चे मालक आर. एम. धन्नावत,सखाराम वलटे, बबन तिरुखे, मोहन मोरे, सौ.छायाबाई कांबळे, सौ. राधाबाई शिराळकर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये