ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुगनाळा शाळेत व्यसनमुक्तीवर सामान्य ज्ञान स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

 ब्रम्हपुरी :- चंद्रपूर जिल्हा व्यसनमुक्त शाळांचा जिल्हा व्हावा यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन ही संस्था कार्यरत आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुगनाळा केंद्र बेटाळा प.स ब्रम्हपुरी तंबाखूमुक्त व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणं व्हावी यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस सहभाग दर्शविला.

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहनदास बोरकुटे, तसेच श्री गजानन प्रधान, प्रभा गणवीर,संगीता वैद्य, योगराज बोरकुटे, गोपाल राऊत, स्वाती लाडेकर व गोवर्धन टिकले सर आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये