Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बँकेविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- डीजीटल इंडिया अंतर्गत सर्व बँकाचे व्यवहार इंटरनेट प्रणीलीद्वारे होत असून यामुळे आर्थिक व्यवहार व देवान घेवान गतीमान झाले आहे. मात्र याच सर्व यंत्रणामध्ये सतत बिघाड होत असल्याने पुर्ण व्यवस्था कोलमडत असुन जिवती येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेची मागील एक ते दोन महिन्यापासून सतत लिंक फेल राहत असल्याने ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बँकीग व्यवहार गतीशील होऊन पेपरलेस व्यवहार वाढविण्याच्या दृष्टीने शासण धोरणाप्रमाणे आणि रिझर्व बँकेच्या दिशा निर्देशांप्रमाणे बँकचे व्यवहार डिजीटल करण्यात आले. त्यामुळे शहरी, नोकरदार तसेच मोठया व्यापाऱ्यांचे व्यवहार गतीने व्हायला लागले. ग्रामीण अर्थव्यवस्था संपूर्ण शेतीवर अवलंबुन असून पिक लागवडी पासून ते पीक घरात येईपर्यंत शेतकऱ्याला पैशांची आवश्यकता असल्याने शेतकरी आणि नागरिकांची तसेच लाडक्या बहिणींची, बँकामध्ये गर्दी वाढली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून जिवती येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेची लिंक फेल राहत असल्याने नागरिक व शेतकऱ्यांच्या नाहक हेलपाट्या होऊन त्यांचा वेळ व श्रम फुकट चालला आहे.तरी वरील सर्व समस्या बँकेने लक्षात घेता सात दिवसाच्या आत लिंक फेलची समस्या सुरळीत करावी जर समस्या सुरळीत झाली नाही तर तालुक्यातील जनतेला घेऊन बँकेच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिवतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाधक्ष्य विजय गोतावळे यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये