Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे राजीव गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील स्थानिक विश्राम गृह येथे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना दिवस साजरा करत राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजीव गांधी यांनी दूरदृष्टी ठेवत सखोल तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला होता त्यांच्या दूरदृष्टिमुळे आज भारत देशात तंत्रज्ञान विकसीत झाले आहे.

तसेच त्यांचे विचार व त्यांचे कार्य यांचा गौरव सुजित यांनी आपल्या मनोगतद्वारे सर्वांसमोर मांडला,त्याचबरोबर काँग्रेस नेते सत्यनारायण पावले यांनी त्यांच्या स्मृतींना आपल्या भाषण द्वारे उजाळा दिला व सर्वांनी अभिवादन केले.यावेळी मुन्ना ठाकूर,सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ झोरें,रवींद्र इंगळे,सत्यनारायण पावले,शेख शकील,मोहम्मद आदींसह नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये