Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

शुक्रवारी सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा तसेच हिंदु अत्याचाराविरुद्ध शहर बंद करण्याचे आवाहन

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे चंद्रपुरातही पडसाद

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने येत्या शुक्रवारी 23 ऑगस्टला शिस्तबद्ध पद्धतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येईल अशी माहिती सकल हिंदू समाजाचे संयोजक शैलेश बागला यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी सकल हिंदू समाजाचे संयोजक रोडमल गहलोत, रामकिशोर सारडा,मिलिंद कोतपल्लीवार,गुणवंत चंदनखेडे, दामोदर मंत्री,अजय जयस्वाल, रणजीतसिंग सलुजा, ग्यानचंद टहलियानी, यशवंत कलमवार, मधुसुदन रुंगठा, अशोक हासानी,
रीतेश वर्मा, प्रा.जुगलकिशोर सोमानी, विनोद कुमार तिवारी, डॉ.शैलेंद्र शुक्ला व पंकज शर्मा ह्यांचेसह शीख, सुदर्शन तसेच वाल्मिकी समाजाच्या गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

बंगलादेशातील जनतेने तेथील सरकारविरुद्ध बंड केल्यानंतर  पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात शरण घेतली. असे असतांना बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू झाले आहेत. हिंदूंची घरे जाळली जात असून त्यांना शासकीय नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे. हिंदूंच्या मालमत्ता लुटल्या जात असुन कित्येक हिंदु बांधवांना लक्ष करून जिवे मारण्यात आले आहे तसेच कित्येक स्त्रियांवर हल्ले करून त्यांच्या अब्रूची लक्तरे काढण्यात येत असून हे सर्व प्रकार मानवतेला काळिमा फासणारे असल्याचे शैलेंद्र बागला ह्यांनी प्रतीपदित केले आहे.

शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी बांगला देशात हिंदूंवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराविरुद्ध भारत सरकारने योग्य ती पावले उचलून हिंदूंवरील अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येऊन निषेध नोंदविण्यात येईल. दरम्यान व्यापारी, शाळा व इतर प्रतिष्ठानांना बंद पाळण्याचे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

या मोर्चात 10 हजार हिंदू सहभागी होतील असा आयोजकांचा अंदाज असुन ह्या मोर्चात बालकांचा समावेश असणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व हिंदू धर्मियांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात उपस्थित सकल हिंदू समाजाचा वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये