Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध होर्डीग कार्यवाही न करणाऱ्या नोडल अधिकारी निखिल लोहवे यांच्याकडून पदभार कडून अवैध होर्डीग वर कार्यवाही

मुख्याधिकारी नगरपरिषद यांना भिम आर्मीचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  काही दिवसांपूर्वी मुबंई येथे विशाल होडीग पडून 14 ते 15 लोकांचा मृत्यू होऊन 40 ते 45 लोकांना अत्यंत गंभीर दुखापत झाल्या होत्या,त्याबद्दल विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांनी जिल्ह्यात निवेदन देऊन त्यावर काही दिवसात काही प्रमाणात कार्यवाही ला सुरुवात करण्यात आली होती.

परंतु त्यानंतर ही कार्यवाही अचानकपणे बंद करण्यात आली,त्याबद्दल संघटनेच्या वतीने 25/07/2024 निवेदन सादर करण्यात आले होते ,अवैध होडीग वर कार्यवाही सामान्य जनतेचा जीव गेल्यावर होणार काय ? असा प्रश्न ही उपस्थित केला होता, तेव्हा मुख्याधिकारी नगर परिषद यांनी संबंधित नोडल अधिकारी निखिल लोहवे याना दूरध्वनी वर समर्पक करून उद्या पासून कार्यवाही करण्यास सांगितले, परंतु त्यांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने संबंधित नोडल अधिकारी निखिल लोहवे यांची रोजी भिम आर्मी चे विदर्भ प्रमुख आशिष सोनटक्के भेट घेतली व विचारणा केली असल्यास संबंधित अधिकारी यांनी सांगितले की अवैध होडीग चालकालाना नोटीस पाठवली ,त्याचे उत्तर याचे आहे गेल्या 3 ते 4 महिन्यापासून त्याचे असे प्रश्न व टाळाटाळी चे उत्तर मिळत आहे,त्यामुळे पुन्हा मुख्याधिकारी नगर परिषद दि 01/08/2024 याची भेट घेऊन कार्यवाही करण्यास सांगितले ,तेव्हा पुन्हा संबंधित नोडल अधिकारी निखिल लोहवे याना कार्यवाही करण्यास मुख्याधिकारी यांनी सांगितले,परंतु वरिष्ठ अधिकारी याच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे संबंधित नोडल अधिकारी यांची अवैध होडीगच्या संचालक, व्यक्ती ,कंपनी सोबत मिलीभगत किंवा टक्केवारी असल्याने ही कार्यवाही होत नसल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे ?

    त्यामुळे संबंधित नोडल अधिकारी निखिल लोहवे याच्यावर कार्यवाही करून त्याच्या कडून हा नोडल अधिकारी असल्याचा पदभार काढून घेण्यात यावा. वर्धा शहराच्या विविध ठिकाणी बॅनर म्हणून शुभोभिकरन ची वाट लागली असुन फक्त बघण्याची भूमिका घेत आहे,या अगोदर काही लोकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्याचे होडीग लावली होती तेव्हा याच नोडल अधिकारी निखिल लोहवे यांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता,परंतु वारंवार तक्रार देऊन इतर लोकांनवर कोणत्याही कार्यवाही करण्यात येत नसून सगळ्या लोकांन साठी न्याय वेगवेगळा आहे काय? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.

    येत्या 3 दिवसात अवैध होडीग संचालकांवर गुन्हा दाखल करत अवैध होडीग काढून कार्यवाही करण्यात आली नाही तर नगरपरिषद वर्धा पुढे आमरण उपोषनाला सुरुवात करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदन देतांना मुख्याधिकारी नगरपरिषद व सहाय्य आयुक्त नगरपरिषद विभाग वर्धा,जिल्हाधिकारी साहेब यांना ही प्रतिलिपी विदर्भ अध्यक्ष आशिष सोनटक्के दिल्याचे य सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये