Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्टेला मॅरीस कॉन्वेंट स्कूल कोरपना येथे स्वातंत्र्य दिन व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

अमृत महोत्सवी वर्षातील यंदाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्य कोरपन्यातील स्टेला मॅरीस कॉन्वेंट स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित स्वातंत्र्यदिनपर कार्यक्रमात सहभागी होऊन ध्वजारोहण केले.

याप्रसंगी माझ्यासमवेत भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, शाळेच्या प्राचार्या सिस्टर कार्मेल डी. एम., सिस्टर अर्पना डी. एम., भाजपाचे विशाल गज्जलवार, सुनील देरकर, पवन बुरेवार, मोहब्बत खान यांचेसह शाळेचे शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मित्र-मैत्रीणींची उपस्थिती होती.

आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना, क्रांतिकारकांना, हौतात्म्य पत्करलेल्या शहीद वीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो.

असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले हे स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मूल्ये अबाधित ठेवण्यासाठी देशाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य म्हणून आपण सर्वांनी संकल्पबद्ध झालं पाहिजे. यासोबतच सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य-जबाबदारीच्या भावनेतून भारताला विकसित राष्ट्र करण्याकरिता राष्ट्रविकासात योगदान देण्याचेही मी तरूण पिढीला आजच्या या स्वातंत्र्यदिनी आवाहन करतो. असे प्रतिपादन याठिकाणी बोलतांना केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये