Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष पथकाची मोठी कारवाई! – मर्सडिज गाडीने मद्यप्रदेश मधून येणारा सुगंधित तंबाखू जप्त!

16 लाखाचे वर मुद्देमाल जप्त तर दोन आरोपी अटकेत!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- शहरात दि. 13.08.2024 रोजी CIU टीम ने पुलगाव शहरात सुगंधित तंबाखू संधर्भात रेड करुन 16,08,638 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

  सविस्तर पुलगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत स्थानिक शहरातील संत गाडगबाबा चौक परिसरात आरोपी क्र 1) मनीष बन्सीलाल गिलानी वय 36 वर्षे रा. सिंधी कॉलनी पुलगाव आणी 2) पंकज तिलकराज बत्रा वय 42 वर्षे रा पुलगाव यांचेकडून 1) जनम कंपनीचे 500 ग्रॅम वजनाचे व 250₹ किमतीचे 80 पॅकेट किं. 20,000 रुपये 2) gold R G20 कंपनीचे 500 ग्रॅम वजनाचे 600 रुपये किमतीचे 20 पॅकेट किंमत 12,000 रुपये 3) रिमझिम कंपनीचे 1 कीलो वजनाचे सुगंधित तंबाखू किंमत 550 रुपये व 40 पॅकेट किंमत 22,000 रुपये 4) विमल पान मसाला गुटखाचे 126 ग्रॅम वजनाचे व 198 रुपये किमतीचे 66 पॅकेट किंमत 13,068 रुपये5) पान पराग मसाला गुटखाचे 96 ग्रॅम वजनाचे व 128 रुपये किमतीचे 100 पॅकेट किंमत 12,800 रुपये 6) v1 तंबाखू कंपनीचे पॅकेट किंमत 22 रुपये एकूण 60 पॅकेट किंमत 1320 रुपये 7) राजश्री पान मसाला गुटखा चे 172 ग्रॅम वजनाचे व 270 रुपये किमतीचे 35 पॅकेट किंमत 9,450 रुपये 8) 500 ग्रॅम वजनाचे 555 लिहिलेले सुगंधित तंबाखू 200 रुपये 40 पॅकेट किंमत 8000 रुपये 9) गोल्ड कंपनीचे 500 ग्रॅम वजनाचे व 250 रुपये किमतीचे 40 पॅकेट किंमत 10,000 रुपये 10) एक kia seltos कंपनीची कार क्र MH 32 AS 8171 किंमत 15,00,000 रुपये अशा एकूण 16,08,638 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आरोपींनी हा मुद्देमाल सौंसर (म.प्र.) येथील दादाजी नावाचे इसम जवळून आणल्याचे सांगत आहे मुद्देमाल जप्त करून पुलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा व चा.पो.शि. महेश कावळे, पो.मू. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये