Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चार जणाचा बळी घेणारा व तिन जणांना जखमी करणारा ट्रक व चालक ताब्यात !

पुलगाव पोलीसानी कोलकत्ता येथे जावुन घेतले ताब्यात !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- पोलीस स्टेशन पुलगाव दिनांक 05/08/2024 रोजी सकाळी 09/00 वा. दरम्यान ऑटो चालक त्याचा ऑटो क्रमाक MH-32-B-7356 ने पत्नीसह मौजा इंझापुर येथुन पुलगाव येथे येत असतांना रस्त्याने एक तरुणी, दोन पुरुष व दोन स्त्रिया असे प्रवासी केळापुर बस स्टँडवर न मिळाल्याने त्यांना ऑटोमध्ये बसविले जेव्हा ऑटो केळापुर बस स्टँड वरून अंदाजे एक किलोमिटर अंतरावर गेले असता रस्त्याच्या वळणावर अचानक समोरुन एक ट्रक कंटेनरने सदर ऑटोला धडक देवुन अपघात केला. त्या अपघातात चार इसमाचा मृत्यु झाला व फिर्यादीसह तीन इसम जखमी झाले अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन पुलगाव अपराध क्रमाक 0667/2024 कलम 105,281,125(A), (B) BNS R/W 134,184 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोद करुन तपासावर आहे.

सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगाव .राहुल चव्हाण, यांचे मार्गदर्शनात PSI दिपक निंबाळकर पोलीस स्टेशन पुलगाव येथील त्यांची पोलीस टीम हे तपास करीत असतांना सदर अपघात करणारा ट्रक कंटेनर यांचे रोडवरील सी.सी.टि.व्ही फुटेज प्राप्त करुन ट्रकचा क्रमाक WB-11-F-2177 असा प्राप्त करण्यात आला सदर ट्रक व ट्रक चालक हा कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथे असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे सार्थक मेहते पोलीस निरीक्षक तात्कालीन ठाणेदार पोलिस स्टेशन पुलगाव यांचे आदेशाने कोलकत्ता येथे पोलिस उपनिरीक्षक दिपक निंबाळकर पो.हवा अमोल जिंदे ना.पो.शि. रवि जुगनाके पो.शि. ओंम तल्लारी सह कलकत्ता (पश्चिम बंगाल) येथे जावुन तेथील पोलीस स्टाफची मदत घेवुन तेथील कलकत्ता, हावडा, हुगली इत्यादी ठिकाणी अपघात करणा-या ट्रक व चालकाचा कसोसीने प्रसत्न करुन शोध घेतला. सदर ट्रक क्रमाक WB-11-F-2177 व ट्रक चालक अरुणसिंह शत्रुधनसिंह वय 35 वर्ष रा. योगीयार पोस्ट सिधवल्ला जोईगर, गोपालगंज बिहार यास दि. 09/08/2024 रोजी डणकुनी पोलीस स्टेशन हद्दीतुन ताब्यात घेण्यात आले. अपघात करणारा ट्रक कंटेनर क्र. WB-11- F-2177 व ट्रक चालकास अटक करुन ट्रक कंटेनर जप्त करण्यात आले.तरी पुढील तपास सुरु आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगाव राहुल चव्हाण, राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांच्या मार्गदर्शनात यांचे पो.उप.नि दिपक निंबाळकर, पोलीस अंमलदार सुधिर लडके, चंद्रशेखर चुंटे, अमोल जिंदे, रितेश गुजर, रवि जुगनाके, ओमप्रकाश तल्लारी, विश्वजीत वानखेडे, उमेश बेले यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये