Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रांती शहर संघातर्फे हाॅकर्स प्लाझा दुरुस्त करून दुकानदार यांना देण्यात यावे व विविध मागण्याचे निवेदन !

जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांनाा देण्यात आले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- दीनदयाल अंतोदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत अनेक वर्षापासून जिल्हा सत्र न्यायालयासमोर हाॅकर्स प्लाझा संच एरिया व्यवसाय करीता शासनाचा मोठा निधी खर्च करून त्याचे बांधकाम करण्यात आले तसेच तत्कालीन पालकमंत्री माननीय सुनील केदार तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच एन यु एल एम च्या चित्राचा प्ले लिखिता ठाकरे क्रांती संघाच्या शहराध्यक्ष शारदा झांबरे व तसेच इतर संघाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पडला.

त्यानंतर बचत गटातील महिलांनी तिथे वेगवेगळ्या वस्तूचे दुकान लावले परंतु मागच्या बाजूने पूर्ण पुणे बंद नसल्याने महिलांचे दीड ते दोन लाखाचे साहित्य चोरीला गेले त्यामुळे महिलांनी दुकान लावणे बंद केले बचत गटातील महिलांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे आपल्या ताफ्यासह भर पावसात सायंकाळी सात वाजता हाॅकर्स प्लाझाची पाहणी केली असता कोण कोणत्या गोष्टीचा अभाव कमी आहे या गोष्टीची नोंद अधिकाऱ्यांना घ्यायला लावली मात्र त्यानंतर क्रांती शहर संघाच्या महिलांनी हाॅकर्स प्लाझा संबंधी मुख्याधिकारी वर्धा व जिल्हाधिकारी वर्धा यांच्याशी वारंवार चर्चा केली असताना फक्त आश्वासन देण्यात आले तरी हाॅकर्स प्लाझाची दुरुस्ती करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी वर्धा व मुख्याधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी निवेदन देताना क्रांती शहर संघाच्या शहराध्यक्षा शारदा झांबरे सारिका खैरकर पूजा बोंबले त्रिशेला जैन रूपाली जुमले प्रीती फुल प्रीती तिरपुडे अंकिता मैंद सोनाली देवगले नीता सूर्यवंशी मंगला नरांजे इत्यादी महिला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये