Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिक पाहणी कार्यशाळा संपन्न

पणन हंगाम २०२३-२४ शेतकऱ्यांना दर घसरण तफावत हेक्टरी ५०००/- रू मिळणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

  महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन विभागाचे शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2024 वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्रीअजितदादा पवार यांनी दिनांक पाच जुलै 2024 ला पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्प भाषणामध्ये कापूस सोयाबीन पिकाचे शेती उत्पन्नात मोठा वाटा आहे.

मात्र पणन हंगाम 2023 24 मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी अन्यकारण यामुळे झालेल्या किमतीमधील घसरण शेतकऱ्यांना निर्माण झालेलं आर्थिक अडचणी यावर शासनाने दोन हेक्टर मर्यादित सोयाबीन व कापूस या पिकासाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली 11 जुलै रोजी मंत्रिमंडळाने हा प्रस्ताव मान्य करून त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ४१९४-६ ८ कोटी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्यकरिता खर्चाला मान्यता दिली आहे राज्यातील 2023 24 खरीप हंगामात कापूस सोयाबीन ई पिक पाहणी / ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानूसार परिगणना करूण डि बि टी माध्यमातून अर्थ सहाय्य बॅक खात्यावर जमा केल्या जाणार आहे शेतकऱ्यांना बैक रवाते आधार लिंक केवायसी अद्यावत करूण घ्यावे पिपरडा येथेएक गाव एक वान या योजनेअंतर्गत शेतकरी संवाद सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावरील बॅटरी चलित स्प्रे पंप एक एकर मर्यादित फल उत्पादन अभियान अंतर्गत मिरची लागवड करिता बारा हजार रुपये अनुदान त्याचबरोबर शेतकऱ्यांनी एक गाव एक वान कापूसउत्पादन तंत्रज्ञान व कापूस प्रक्रिया विक्री व्यवस्थापन या विषया मार्गदर्शन करण्यात आले तसेच पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती प्रकल्प अंतर्गत गावातील 50 शेतकऱ्यांची निवड करून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वैनगंगा शेतकरी महासंघ उपाध्यक्ष आबिद अली यांनीशेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा व योजनेमधून शेतीमध्ये उत्पादनात वाढ व कमी खर्चाचे तंत्राचा वापर करण्याचे आवाहन केले यावेळी प्रतीक भेंडे कृषी मूल्य साखळी तज्ञ आकाश गोखरे मल्टी कॉटन ग्रेडर नामदेव राठोड कृषी पर्यवेक्षक संदीप कांबळे कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेच्या लाभाबद्दल माहिती दिली.

यावेळी गावातील शेतकऱ्यांबरोबर हितगुज करून शेती शिवारात शिवार फेरी काढून पीक पाहणी व कापसावरील रोगाबाबत करावयाचे उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले कृषी सेवक पद्माकर लोढे गटप्रमुख रमेश ठाकरे चंद्रभान तोडासे विनोद तुरंकणर लचु सोयम यांचे सह अनेक शेतकरी शिवार फेरीत सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये