Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोडाझरि तलाव ओव्हरफ्लो वर आनंद घेण्याकरिता अफाट गर्दी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तहसील अंतर्गत येणाऱ्या घोडा झरि तलाव ओव्हरफ्लो होत असल्याने आणि रविवारची सुट्टी असल्याने पंचक्रोशीतील पर्यटक आनंद घेण्यासाठी नागपूर, चंद्रपूर,गडचिरोली भंडारा जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने प्रचंड गर्दी झाली आहे.

 यामुळे घोडाझरि तलाव परिसराला जत्रेचे स्वरूप निर्माण झाले आहे. नागभीड येथील वन विभाग आणि पोलीस विभाग येणाऱ्या पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सतर्क राहून कॅमेरा ड्रोन द्वारे लक्ष देऊन पाहणी करण्यासाठी सर्व वन विभाग टेहळणी करीत आहे.

रस्ता लहान असल्याने वाहन चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे तरी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये