Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतीक आदिवासी दिन निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  दिनांक ९ ऑगस्ट रोजी अस्तित्व बहुउद्देशीय संस्था नवेगाव यांच्या तर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एकूण ३१ जणांनी रक्तदान केले यात महिला वर्ग देखील सहभागी झाला होता.अस्तित्व बहुउद्देशीय संस्था नवेगाव हे नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. त्या अनुषंगाने रक्त संक्रमण अधिकारी डॉ मुकुंद ढबाले यांच्या हस्ते विर बाबुराव शेडमाके, बिरसा मुंडा व पहांदी पारी कुपार लिंगो यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि रक्तदानाला सुरुवात करण्यात आली.

सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत एकूण ३१ जणांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री गजानन गेडाम आणि सचिव उमेश वेलादी यानी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष रामेश्र्वर नागभिडकर, विशाल खरात, धीरज खेवले, गणेश साळवे, समता चांदेकर, मरस्कोल्हे आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये