Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक परिषदेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार 

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही उत्तम वैचारिक विचारांची बांधणी असलेली राज्यव्यापी संघटना असून त्या संघटनेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आयोजित सभेत केले.

यावेळी शिक्षकांच्या समस्या/मागण्या पालकमंत्री यांनी ऐकून घेतल्या असून भविष्यात मंत्रालयीन स्तरावर तसेच जिल्हा परिषद स्तरावर सभा होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हटले.

सभा मंचावर डॉ.मंगेश गुलवाडे, प्रकाश चुनारकर, विनोद पांढरे, मधुकर मुप्पीडवार, रामदास गिरटकर, जिल्हाध्यक्ष – विलास खोंड, जिल्हाकार्यवाह – दिलीप मॅकलवार, कॉन्व्हेंट स्कूल अध्यक्ष विवेक आंबेकर, अमोल देठे, सरिता सोनकुसरे, संतोष सोनवणे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग चे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या समस्या/मागण्या या सभेत राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी मांडल्यात.

समस्या/मागण्यात प्रामुख्याने जिल्हा परिषद चंद्रपूर मधील प्राथमिक शिक्षकांना संगणक अर्हता प्रमाणपत्र सक्ती तात्काळ रद्द करणे, जिल्हा परिषद चंद्रपूर मधील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तात्काळ देणे, डि.सी.पी.एस.मधील रक्कम भविष्य निर्वाह निधी मध्ये वळती करणे, जिल्हा परिषद चंद्रपूर मधील प्राथमिक शाळांतील विषय शिक्षकांची रिक्त पदे भरणे, पदोन्नती प्रकरणे, नक्षलग्रस्त/आदिवासी एकस्तर वेतनश्रेणी व प्रोत्साहन भत्ता थकबाकी देणे, मंजूर वैद्यकीय देयकासाठी निधी देणे, शालार्थ प्रणालीत अतिरिक्त घरभाडे टॅब उपलब्ध होणे, जिल्हा अंतर्गत विनंती बदली संधी देणे,डि.सी.पी.एस.रक्कम एन.पी.एस.मध्ये जमा करणे, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रकरणे, आदिवासी भागात कार्यरत शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता, जिल्हा शिक्षक पुरस्कार वेतनवाढ आदि समस्यांचा सामावेश होता.

सभेचे सूत्रसंचालन विवेक आंबेकर यांनी केले.

माध्यमिक विभागाच्या समस्या जिल्हाध्यक्ष विलास खोंड, इंग्रजी माध्यमाच्या शाळा समस्या कार्यवाह संजय उपाध्ये, खाजगी प्राथमिक समस्या सहकार्यवाह संतोष सोनवणे यांनी मांडल्यात.

सभेला विलास बोबडे, देवेंद्र कांचर्लावार, वसंतराव वडस्कर, विलास खाडे, विलास वर्भे, हरिश्चन्द्र पाल, खारकर सर,मनोहर झोडे,अजय बेदरे, सुशांत मुनगंटीवार, सतीश दुवावार, दिलीप राठोड, विजय नळे, आनंदराव वेलादी, विनोद गौरकार,कनिराम पवार, सतीश तन्नीरवार,भारत श्रीरामे, रामराव पवार,वसंत किन्नाके, प्रवीण कडू, शुभांगी डोंगरवार, अनुराधा उपाध्ये, कविता कोटकर, हर्षा वावरे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पदाधिकारी तथा कार्यकर्त उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये