तंटामुक्ती अध्यक्षाचाचं गावातील शेतकऱ्यावर अन्याय
माहेर येथील शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या गुलाब बागडे याला नायब तहसीलदारांचा दणका
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
चोराला पकडला जाण्याची भीती नेहमीच असते. कारण त्याला ठाऊक आहे की जर तो पकडला गेला तर त्याच्यासोबत वाईट घडणारचं,असाच काहीसा प्रकार ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा माहेर येथे घडला, चार शेतकऱ्यांचा वहिवाट रस्ता अडवून त्यांच्या शेतातील पेरणी व इतर कामे अडकविल्या प्रकरणी माहेर येथील तंटामुक्ती अध्यक्ष गुलाब बागडे याला नायब तहसीलदार ब्रम्हपुरी यांनी, बागडे याने वन विभागातील जागेवर अतिक्रमण केल्याचे नमूद करीत,चारही अर्जदार शेतकऱ्यांना वहीवाटीचा रस्ता मोकळा करून देण्याचा आदेश दिलेला आहे.
माहेर येथील चार शेतकरी अक्षय हजारें, नंदकिशोर सहारे,राधेशाम सहारे व कमलाबाई राखडे यांनी तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथे अर्ज करीत गैरअर्जदार गुलाब शंकर बागडे हा वन विभागाचे गट क्रमांक 46/1 शासकीय मालकीच्या जागेतुन आमच्या शेताकडे जाणाऱ्या पूर्वापार, नियमित रस्त्यावरून जाणे येणे करण्यास अटकावं करीत असून आम्हाला दुसरा कुठलाही रस्ता नाही त्यामुळे शेत मशागतीच्या वेळात पेरणी व इतर कामात अडचण आल्याने उपासमारीची वेळ येत असल्याचे अर्जात सांगितले.गैरअर्जदार गुलाब बागडे यांना वेळोवेळी संधी देऊनही आपले बयान सादर केले नाही त्यामुळे नायब तहसीलदार यांनी तलाठी अहवाल व चौकशी अंती अर्जदारांना त्यांच्या शेतात जाणे येणे करिता वन विभागाचे गटातून अडथळा करू नये व पूर्वापार असलेला रस्ता मोकळा करण्याचा आदेश दिला आहे.
गुलाब बागडे नामक व्यक्ती तंटामुक्ती समिती अध्यक्ष, तसेच गावातील राजकीय व सामाजिक कारभारात सक्रिय सहभाग असतो त्याच व्यक्तीकडून गावातीलच शेतकऱ्यावर अन्याय होतं असेल तेव्हा दोषी व्यक्तीवर मोठी कारवाई व्हावी अशी आशा नागरिक करीत आहेत.