Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोफत कृत्रिम अवयवांचे मूल्यांकन आणि पूर्वनोंदणी शिबिर

महावीर इंटरनॅशनल सेवा ट्रस्ट नागपूर व चंद्रपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर

महावीर इंटरनॅशनल सेवा ट्रस्ट नागपूर व महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम अवयवांचे मूल्यांकन आणि पूर्वनोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून,  ज्या गरजू व्यक्तींना अपघात किंवा इतर कारणांमुळे हातपाय गमवावे लागले आहेत त्यांच्यासाठी ११ ऑगस्ट रोजी खजांची भवन, जैन मंदिर, सराफा लाईन शहर पोलीस स्टेशनसमोर चंद्रपूर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

 शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत २२,२३ आणि २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत अग्रेसर भवन, रविनगर, नागपूर येथे नोंदणीनंतर ओळखल्या जाणाऱ्या गरजूंना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात येणार आहे. (रुग्णांना आधार कार्ड फोटो, दोन पासपोर्ट फोटो आणि जुनी वैद्यकीय कागदपत्रे) सोबत आणावे. रुग्णांना जेवण दिले जाईल तसेच पात्र व्यक्तीस नागपूरला पोहोचल्यावर ५० टक्के बस तिकिटाचे भाडे दिले जाईल

नोंदणी आणि मापनात जयपूर पायांसह कृत्रिम हातांचा वापर केला जाईल. तज्ञांची टीम पात्रतेचे मूल्यांकन करेल. नोंदणी शिबिरात आकार आणि मोजमाप घेतले जाईल.

 महावीर इंटरनॅशनल सेवा ट्रस्ट नागपूर, रायसोनी फाउंडेशन आणि महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे पूर्व नोंदणी शिबीर ११ ऑगस्ट रोजी चंद्रपुरात होणार आहे.

 महावीर इंटरनॅशनल अनेक वर्षांपासून पीडित मानवतेची सेवा करत आहे. महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्राचे मुख्य सल्लागार वीर दिलीप भंडारी, अध्यक्ष वीर त्रिशूल बंब, सचिव वीर प्रसन्न बोथरा व प्रकल्प संचालक तुषार डगली, वीर विशाल कल्लूरवार यांनी या शिबिराचा लाभ प्रत्येक घटकातील पीडित व गरजूंनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.

**पूर्वनोंदणी शिबीर**

मुल्यांकन – आमची तज्ञ चमु तुमच्या गरजा आणि कृत्रिम अवयवासाठी पात्रतेचे मुल्यांकन करेल.

पूर्व नोंदणी – पात्र व्यक्तीस कृत्रिम अवयव वितरण प्रक्रियेसाठी पूर्व नोंदणी केली जाईल. आकार आणि मोजमाप कृत्रिम अंग (जयपूर पाव व हात) तंतोतंत बसण्यासाठी योग्य माप असल्याची खात्री करण्यासाठी आवश्यक मोजमाप.

तारीख : पात्र व्यक्तिस त्याच दिवशी कृत्रिम अवयव वितरण करण्याची नागपूर येथील तारीख दिली जाईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये