Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येते कला,वाणिज्य व विज्ञान विभागाच्यावतीने प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दिनांक ५ व ६ ऑगस्टला दोन दिवसीय इंडक्शन प्रोग्रम आयोजित करण्यात आला.सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार जिवन राजगुरू यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ऐ.चंद्रमौली तर प्रमुख अतिथी डॉ. अशोक खोब्रागडे,कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.प्रशांत वासाडे उपस्थित होते. या दोन दिवसीय इंडक्शन प्रोग्रम मध्ये महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. या इंडक्शन प्रोग्रामच्या उद्घाटनीय सत्रामध्ये उद्घाटक जीवन राजगुरू पोलीस निरीक्षक यांनी आपला प्रेरणादायी प्रवास सांगीतला तर अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.चंद्रमौली यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागींन विकासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन प्रा.आशिष शेंडे यांनी केले तर आभार प्रा.सचिन वाकडे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये