Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्ग चार,पटसंख्या ८१ शिक्षक मात्र दोनच

सावली शाळा क्र २ येथील प्रकार ; जि.प. शाळांची दयनिय अवस्था

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

   सावली पंचायत समिती अंतर्गत सावली येथील शाळा क्र. २ येथे वर्ग एक ते चार असुन पटसंख्या ८१ आहे. मात्र पटसंख्येच्या मानाने या शाळेत दोनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होणार याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून सावली येथील शाळा क्र. २ येथे पटसंख्येनुसार कायमस्वरुपी शिक्षक देण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

मागील सत्रात सावली शाळा क्र. २ येथे चार शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी एक शिक्षिका निवृत्त झाल्या तर एका शिक्षिकेची बदली करण्यात आली. त्यामुळे सध्या तरी या शाळेतील ८१ विद्यार्थ्यांचा भार फक्त दोनच शिक्षकावर आहे. त्यात एक मुख्याध्यापक व एक सहाय्यक शिक्षक असल्याने कधी कधी एकाच शिक्षकाला चार वर्ग सांभाळण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती होणार कशी असा प्रश्न केल्या जात आहे.

आज घडीला सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता ठिकठिकाणी जाणवत आहे. काही मोजक्या शाळा सोडल्या तर इतर जि.प. शाळांची चर्चा न केलेली बरी अशीच स्थिती आहे. ग्रामिण भागात प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळांमधुनच दिले जाते. असे असतांना जिल्हा परिषद शाळामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची व्यथा पालक मांडत आहेत. तर काही जिल्हा परिषद शाळांना शिक्षकाच्या मागणीसाठी कुलूप लावणार असल्याची सुध्दा चर्चा आहे. परंतु याकडे मुद्दाम डोळेझाक होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी सावली शाळा क्र. २ ला रिक्त असलेल्या जागेवर शिक्षकांची नेमणुक करण्याची मागणी जोर धरत आहे.

जिल्हा परिषद शाळांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पुर्णत: दुर्लक्ष होत असल्याने शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याकरीता या क्षेत्रातील लोकप्रतिनिधीनी पाठपूरावा करुन जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविण्यास सहकार्य करावे.

आकाश खोब्रागडे, पालक

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये