‘पाऊस : तुझ्या आणि माझ्या वस्तीतला’ ब्रह्मपुरीत पावसाच्या कवितांनी रसिक ओलेचिंब
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
येथील ने.हि. महाविद्यालयातील स्व. हिरालालजी भैया सभागृहात ‘ ‘पावसाच्या कविता… पाऊस कवितांचा ‘ हे राज्यस्तरीय कविसंमेलन अतिशय थाटामाटात पार पडले. आविष्कार साहित्य मंच व मराठी वाङ्मय मंडळ ने. हि. महाविद्यालय,ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन ने.हि. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एच.गहाणेंनी केले तर संमेलनाध्यक्ष म्हणून राजुरा येथील प्रसिध्द कवी व साहित्यिक डॉ.किशोर कवठे उपस्थित होते.
विशेष अतिथीमधे उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकार तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण आडेकर भद्रावती, कवी डॉ. धनराज खानोरकर ब्रम्हपुरी,दिलीप पाटील राजुरा,गोपालराब कडुकर नागपूर व कल्पना सूर्यवंशी- गेडाम यांनी हजेरी लावली. उद्घाटन सत्राचे संचालन भिमानंद मेश्राम यांनी केले.कविंनी पावसाच्या दर्जेदार कवितां गाऊन रसिकांना ओलेचिंब केले.
निमंत्रित कवींमध्ये नागपूरचे राजेश कुबडे,नागेश वाहुरवाघ, लीलाधर गायकवाड, सकोलीहून वीणा डोंगरवार, प्रियंका रामटेके आमगाव, सुरेश डांगे चिमूर,संजय येरणे नगभिड, चंद्रपूर येथील विजय वाटेकर उपस्थित होते.नंतरच्या खुल्या कविसंमेलनातील सत्रात राज्यभरातून तब्बल६३ कवींनी सहभाग नोंदविला. कविसंमेलनाचे संचालन डॉ. मंजुषा साखरकर व मंगेश गोवर्धन यांनी केले.कवी व रसिकांनी सभागृह अक्षरशः गच्च भरलेले होते व मुसळधार कवितांच्या पावसाने सर्वच चिंब भिजले.आविष्कार ने आपल्या यशस्वी आयोजनात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आविष्कार साहित्य मंचचे अध्यक्ष मंगेश जनबंधू व सचिव गौतम राऊत यांच्यासह भाविक सुखदेवे ,डॉ पद्माकर वानखेडे,वर्षा चौधरी,छाया जांभुळे,सोनाली सहरे,अशोक शामकुळे,इंदू मुळे व इतर सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले. आभार हिरकांत निहटेंनी मानले.