Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे श्री संत सावता महाराज यांची ३०वी पुण्यतिथी उत्साहात साजरी  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथील श्री संत सावता महाराज मंदिर माळीपुरा येथे दिनांक 3 जुलै रोजी दुपारी १ वाजता पालखीची भव्य अशी मिरवणूक काढून पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला .संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताहाची सांगता महाप्रसादाने झाली.

श्री संत सावता महाराज मंदिर माळीपुरा येथे दिनांक28 जुलै ते 3 ऑगस्ट पावेतो संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दररोज सकाळी संत सावता महाराज यांच्या जीवन चरित्र ग्रंथाचे वाचन ह. भ. प. वैभव महाराज झोरे यांच्या मधुर वाणीतून सम्पन्न झाले . ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प. अनिल महाराज सपाटे व ह.भ. प.सुरज महाराज कव्हळे यांच्या मधुर वाणीतून सम्पन्न झाले . सात दिवशीय सप्ताह मध्ये दिनांक 27 जुलै रोजी ह भ प प्रेमानंद महाराज देशमुख, दि .28 जुलै रोजी ह.भ.प पंढरीनाथ महाराज चाटे, 29 जुलै रोजी ह.भ.प रमेश महाराज जायभाये, 30 जुलै रोजी ह.भ.प झगरे गुरुजी वाकदकर, 31 जुलै रोजी ह.भ.प मुरलीधर महाराज म्हसलेकर आळंदीकर 1ऑगस्ट रोजी दत्तात्रय हरणे 2ऑगस्ट रोजी बबन महाराज खार्डे यांचे भव्य कीर्तन महोत्सव सम्पन्न झाले. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता संत सावता महाराज यांच्यामंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्तीचे महाअभिषेक व पूजन सौ. आरती व सुमेध रामभाऊ बोराटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

नंतर १० ते १२ काल्याचे कीर्तन ह.भ.प संत चरनदास निकम गुरुजी यांनी केले . काल्याच्या कीर्तना नंतर शहरामधे दुपारी १ वाजता भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. महाआरती ह.भ. प. निकम गुरुजी यांच्या हस्ते सम्पन्न झाली. आरती नंतर सायंकाळी महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला . यात्याचे आयोजन श्री संत सावता महाराज मंदीर पुण्यतिथी उत्सव समिती माळीपूरा व माळी समाजाने केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समिती चे मार्गदर्शक ह.भ.प. निकम गुरुजी मंदिर समितीचे अध्यक्ष गोविदराव झोरे, समितीचे उपाध्यक्ष रामभाऊ बोराटे, कोशाध्यक्ष उमाजी झोरे, सदस्य गिरीश वाघमारे, कैलास माने, बंडू गाडेकर, पांडुरंग खांडेभराड, हरणाजी माळोदे, पवन झोरे, वैभव झोरे, आकाश झोरे, किशोर खांडेभराड ऋषी तिडके, संतोष खरात,संतोष बोराटे, गणेश तातेराव खांडेभराड, हर्षद बोराटे, पवन गाडेकर, ओम गोपाळ झोरे, अनिकेत भाग्यवंत आदीसह समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतले. प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुरज गुप्ता, मंगेश तिडके,भिमराव चाटे,गणेश डोके यांनी काम पहिले.

     माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर,काँग्रेस नेते मनोज कायंदे,भाजपा नेते डॉ सुनील कायंदे वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे , राष्ट्रवादीकाँग्रेस चे शहर अध्यक्ष कवीश जिंतूरकर आदींनी पालखीचे स्वागत केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये