चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :-ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रांतील उपवन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सोनेगाव येथील शेतात धानाच्या पेंड्या एका शेतातून दुसऱ्या शेतात दुलाई करण्याचे काम करीतअसतांना अचानक झुडपामध्ये लपून बसलेल्या रानटी डुकराने युवा शेतकऱ्यावर हल्ला केल्याने त्या हल्यात धनंजय विठोबा दर्वे नामक शेतकरी जखमी झाला आहे.
उपचारासाठी त्याला ब्रह्मपुरी येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले.
ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील युवा शेतकरी धनंजय दर्वे.वय(३५) वर्ष हे २ आॅगस्टला सकाळच्या सुमारास सोनेगाव शिवारातील शेतात गेला असता. धनंजय कामात मग्न असताना लपून असलेल्या रानटी डुकराने त्याच्यावर हल्ला केला. यात युवा शेतकरी जखमी झाला आहे.
सध्या तालुक्यात धान रोवनीचे काम जोमात सुरू आहेत. त्यामुळे तो पण शेतात कामात होता. शिवाय परिसरात सध्या रानटी डुकराचा. मोठ्या प्रमाणावर वावर असून शेत पिकाची प्रचंड नुकसान रानटी डुकरा कडून होत आहे.परंतु वन विभागाने रानटी डुकराचा बंदोबस्त करावा. आणि रानटी जनावरांपासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व जखमी व्यक्तीचे कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.