Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य योजनेचे मार्गदर्शन शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- येथील श्री व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था गडचांदूर द्वारा संचलित विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील राज्यशास्त्र विभाग तसेच तहसील कार्यालय येथील महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने महसूल पंधरवाडा निमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य योजनेचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. गजानन राऊत हे होते.

कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून नायब तहसीलदार वाहने यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागातील योजनेबद्दल ची माहिती दिली विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच इतरांना सुद्धा शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करावा व आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कॅरियर घडवावे असे मार्गदर्शन केले तसेच ज्या विद्यार्थ्यांची १८ वर्षे पूर्ण झाली आहे त्यांनी मतदार यादी मध्ये नावे नोंद करावी असे आव्हान केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.गजानन राऊत यांनी महसूल विभागाच्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. चतुरदास तेलंग यांनी केले आभार प्रा. कदम यांनी मानले सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये