Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुपिटरला वाहनाची धडक

दोघे जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जालना रोडवरील मधुबन हॉटेलसमोर जुपिटर ला एका वाहनाने मागुन धडक दिल्याने मोटारसायकल स्वार जखमी झाल्याची घटना २७जुलै ला सायंकाळी सहा वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे की दिपक खरात, रा.त्रंबक नगर, सिंदखेड रोड, देउळगाव राजा व त्याचा मित्र संभाजी नन्नवरे, रा पिंपळनेर हे दोघे त्यांचे जवळील स्कूटर टिव्हीएस जुपीटर क्रं MH.28-BU.5680 ने चैत्रबन हॉटेल, देउळगाव राजा येथे जेवण्याकरीता जात असतांना पाठीमागुन मागुन येणारे वाहन MH.28-AN. 1960 चे चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी चालवुन टिव्हीएस जुपीटर क्रे MH.28- BU.5680 स्कुटरला पाठीमागुन धडक दिली. त्यामुळे दिपक खरात याच्या उजवे पायाची मांडी फॅक्चर झाली व ईतर ठिकाणी मार लागला तसेच त्याचा मित्र संभाजी नन्नवरे याचे याचा सुध्दा पायाचा अंगठा फक्चर झाला आहे.व व ईतर ठिकाणी मुक्का मार लागला आहे. घटनेची तक्रार विलास खरात यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी वाहन चालकच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उप निरीक्षक जायभाये करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये