Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बचत गटांनी मुदतीत कर्जवसुली भरून ४.५०% व्याज अनुदानाचा लाभ घ्यावा – संतोषसिंह रावत

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वसामान्यांची बँक म्हणुन ओळखली जाते. बँकेने जिल्हयातील बचत गटांना अधिक स्वावलंबी होण्याचे दृष्टीने आपल्या कर्जधोरणात लवचिकता आणून कर्जधोरण सुलभ केले असून नविन बचत गटांना २ महीण्यांत त्यांचे भागभांडवलावर ४ पट कर्ज देण्यांत येत आहे. मागील वर्षीपासुन बचत गटांना १०% व्याजदराने कर्ज देवून ४.५०% नाबार्ड व्याज अनुदान मिळाल्यानंतर प्रत्यक्षात बचत गटांना ५.५०% प्रमाणेच व्याज द्यावे लागेल. त्यामुळे बचत गटांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेउन कर्जाचा निर्धारीत मुदतीमध्ये भरणा करून नाबार्डचे ४.५०% व्याज अनुदानाचा लाभ घ्यावा. यामध्ये बँकेकडुन महीला बचत गटांना सर्वतोपरी मदत करण्यांत येईल असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी केले आहे.

नाबार्डचे बचत गटांना व्याज अनुदान योजनेअंतर्गत जिल्हयातील बचत गटांना व्याज अनुदानाचा फायदा मिळुन महीला वर्गांचे मिळावा याकरीता नाबार्डकडे वारंवार पाठपुरावा करून व वरीष्ठ अधिका-यांसोबत बैठका करून जिल्हयातील महीलांना व्याज अनुदानाचा फायदा मिळवून दिला. त्यानुसार सन २०१८ पासुन नियमित कर्जवसुली भरणा करणा-या बचत गटांना ३ टक्के व्याज अनुदान मिळवून देणारी महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून सन २०१८ पासुन मार्च २०२२ पावेतो २४०२८ बचत गटांना नाबार्ड तर्फे व्याज अनुदान रक्कम ३ कोटी ४३ लाख प्राप्त झाली. असेही बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी आवर्जुन सांगीतले.

नाबार्ड कडुन सन २०२२-२३ या वर्षापासुन बचत गटाचे व्याज अनुदानात ३% टक्यावरून १.५% वाढ करून ४.५०% या दराने व्याज अनुदान देण्यांत येत आहे. व कर्जाची कमाल मर्यादा ५ लाख करण्यांत आली आहे. त्या अनुषंगाने नाबार्ड कडुन बँकेतील ६२७२ बचत गटांना सन २०२२-२३ या वर्षात ४.५०% या दराने रू. २ कोटी ४२ लाख व्याज अनुदान प्राप्त झाले असून रक्कम गटांचे खात्यात जमा करण्यांत आलेली आहे. ही अभिमानाची बाब आहे.

बचत गटांना सर्वतोपरी मदत करणारी महाराष्ट्र राज्यातील जिमस बँकेत आपली बँक प्रथम क्रमांकावर असल्याचा मान जिल्हा बँकेला प्राप्त झालेला आहे. याचा जिल्हयाला सार्थ अभीमान आहे. असेही श्री. संतोषसिंह रावत यांनी सांगीतले.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्हयातील २८६३० बचत गट संलग्न असून दरवर्षी सरासरी ७००० बचत गटांना बँकेच्या ९२ शाखांमार्फत १०% व्याजदराने कर्जवाटप करण्यांत येते. मागील वर्षी २०२३-२४ मध्ये एकुण ६५८८ बचत गटांना रू. १३० कोटी कर्जवाटप करण्यांत आले तसेच यावर्षी एप्रिल ते जुन पर्यंत २७०३ बचत गटांना रू. ६१ कोटी कर्जवाटप करण्यांत आले. व अजुनही मोठया प्रमाणात कर्जवाटप करण्याचा बँकेचा मानस आहे.

नाबार्ड कडुन ५ लाख पर्यंतचे कर्जावर व्याज अनुदान प्राप्त होत असल्यामुळे बचत गटांनी जास्तीत जास्त कर्जउचल करावे व निर्धारीत मुदतीत कर्जाचा भरणा करून नाबार्डचे व्याज अनुदान योजने अंतर्गत ४.५०% व्याज परतावा लाभ घ्यावा. व आपण तसेच आपल्या कुटुंबीयांचे जिवनमान उचावावे. याकरीता बँक सदैव बचत गटांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. याबाबत काही अडचणी आल्यास बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी केले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये