Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचे अपनयन करणाऱ्या आरोपीस वरुड, अमरावती येथून ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर असे की, अल्पवयीन पिडीत मुलगी ही तिच्या आईसह आजोबाकडे राहत असतांना आरोपीने तिचेशी ओळख करून प्रेमसंबंध निर्माण केले व जवळीक साधून दि.10.11.2022 रोजी ती शाळेत गेली असता,तीला फुस लावून नांदगाव बोरगाव येथून तिच्या पालकांचे कायदेशीर रखवालीतून तिचे अपनयन केले. मुलीच्या आजोबाने पो. स्टे. हिंगणघाट येथे दिलेल्या तक्रारी सदर गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला होता.

     घटनेपासून आरोपी हा अल्पवयीन मुलीला घेऊन फरार होता.त्यांचा शोध न लागल्यामुळे दि.03.09.2023 रोजी सदर गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा कडे वर्ग करण्यात आला होता.

       सदर गुन्ह्याचे तपासात यातील आरोपी व मुलीचा सातत्याने शोध घेत असतांना, ते दोघेही वरुड, जि. अमरावती येथे किरायाची रूम घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली म्हणून त्यांचे शोधार्थ दि.30.07.2024 रोजी वरुड येथे पोलीस पथक पाठविण्यात आले. त्यांनी वरुड येथे शोध घेतला असता,यातील पिडीत मुलगी व आरोपी हे आंबेडकर चौक, वरुड येथे दोघेही किरायाने रूम घेऊन एकत्र राहत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात आला.पीडित मुलगी व आरोपीस पुढील तपासकामी पो. स्टे. हिंगणघाट येथे हस्तान्तरीत करण्यात आले आहे.

       सदरची कामगिरी मा. श्री नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, स. पो. नि. वंदना सोनुने यांचे मार्गदर्शनात स. फौ. निरंजन वरभे,नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे,शबाना शेख,अक्षय राऊत यांनी पार पाडली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये