Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते – पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम

विश्वशांती विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक जहालवादी नेते होते,स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच त्यांच्या घोषणेला स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात टिळक यांचे मोलाचे योगदान होते,असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम यांनी मांडले.

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे भारतीय स्वातंत्र्यसेनानी,शिक्षक,संपादक आणि लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

    कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी टिळकांनी गणपती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले,ते एक लोकशिक्षणाचे प्रभावी व्यासपीठ निर्माण व्हावे असे त्यांची इच्छा होती महाराष्ट्रात अनेक गावी सार्वजनिक गणपती उत्सव त्या अनुषंगाने व्याख्याने अंधश्रद्धा,निर्मूलन,मेळावे, लेझीम पथके आदी मुळे लोक एकत्र येऊ लागले त्यापुढे जाऊन शिवजयंतीला सार्वजनिक स्वरूप सुरू केले आणि त्यांनी आपली भूमिका केसरी वृत्तपत्रातून व्यक्त केले असे विचार मांडले.

    मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे शिक्षक प्रवीण काटपल्लीवार,शेखर प्यारमवार,राहुल आदे,प्रथमेश वारजुरकर,युगंधर भोयर,प्रणव पिठाले, प्रनोती सोनुले, काजल बारापात्रे,उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमाचे संचालन महेश देहारकर यांनी केले तर आभार शरदचंद्र पोहनकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद केलझरकर,रामचंद्र खिरटकर,दामोधर आदर्लावार,सुरेंद्र डोहने, नंदू भंडारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये