Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप नेते अनुराग ठाकूर विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रणयकुमार बंडी

 घुग्घुस (चंद्रपुर) : सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय हक्क मिळायला पाहिजे याकरिता इंडिया आघाडीचे नेते देशाचे विरोधीपक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी संसदेत जातीय निहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातूर्वर्ण्या व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते हिमाचल हमीरपूर येथील खासदार तथा माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत राहुल गांधी यांची जात विचारून अपमान केला आहे.

 यामुळे संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 01 ऑगस्ट रोजी काँग्रेस जनसंपर्क कार्यालया समोरील मुख्य मार्गांवर जाहीर निषेध आंदोलन केले.  अनुराग ठाकूर घोषणा देत आपला राग व्यक्त केला.

 याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष दिलीप पिट्टलवार,अलीम शेख, सोशल मीडिया रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला जिल्हा सचिव दुर्गा पाटील, सरस्वती कोवे, शिल्पा गोहील, कविता उंदीरवाडे, मोसीम शेख, विशाल मादर, रोहित डाकूर, विजय माटला, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, सुनील पाटील, बालकिशन कुळसंगे, दिपक पेंदोर, अरविंद चहांदे, कुमार रुद्रारप, कपिल गोगला, सचिन नागपुरे, दिपक कांबळे, भीमराव कांबळे, रंजित राखुंडे, सन्नी कुम्मरवार, अंकुश सपाटे, तन्मय गहुकार, नंदा आत्राम, रूपा पचारे,रेखा मोगरे, शेहनाज बेगम, अलका पारशिवे, इंदू जाधव, सुनीता पाटील, लुबना शेख, नगमा शेख, अश्विनी धुर्वे, अनुसया नन्नावरे, किताबून आपा, मिरा दिवटे, चंदा दुर्गे, वर्षा पाटील, हसीना बेगम व मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये