ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी केले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष अनिलभाऊ स्वामी,सचिव राजाबाळ पा.सगिडवार, कोषाध्यक्ष डॉ.विजय शेंडे,सामाजिक कार्यकर्ता प्रशांत राईंचवार, एड.हरिभाऊ संतोषवार,नगरसेवक सचिन संगीडवार,गुणवंत सुरमवार,मोतीलाल दुधे,सुधाकर गाडेवार,सुधाकर गुंतीवार, केवलराम खेवले,प्रकाश शिंदे,गुलाब गेडाम,शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,प्राचार्य पांडुरंग अमृतवार उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचे भाषणे सादर केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी प्रास्ताविकेतून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक धनंजय गुरनुले यांनी केले तर आभार काजल बारापात्रे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये