Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्याची तत्काळ के वायसी करण्यासाठी मदत करावी – डॉ.अभ्युदय मेघे

बँक ऑफ इंडिया सेलू येथे निवेदनातून केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सध्या सर्वत्र पेरणी झाली असून शेतकऱ्यांना शेती कामासाठी क्रॉप लोन ची आवश्यकता आहे. अशाच शेतकऱ्यांनी बँकेबाहेर रांग लावल्याचे चित्र डॉ. अभ्युदय यांना सेलू दौऱ्यावर असताना दिसले. त्यांनी नागरिकांचे चर्चा केले नागरिकांना येत असलेल्या समस्याची माहिती जाणून घेतली. व प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तात्काळ बँक ऑफ इंडिया शाखा सेलू येथे बँक व्यवस्थापक यांना भेट देऊन नागरिकांची लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी. तसेच त्यांना येत असलेल्या अडचणी पुढील काळात येऊ नये. अशी विनंती त्यांनी पत्राच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक यांना केली.

यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले आपल्याला होत असलेल्या समस्येसाठी मी आपल्या पाठीशी आहे. लवकरच या विषयावर तोडगा निघत यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहे. अशी आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

यावेळी त्यांच्यासोबत शुभम लुंगे. हरीश पारसे, सुशांत वानखेडे, मंगेश वानखेडे, निवृत्ती घुमे, विनीत माहूरे, मनीष फाटे, अनुराग खोबे, विक्रांत उईके, पंकज वानखेडे, दीपक तेलरांधे, विलास वंदिले, सत्यवान वंदिले व सेलू तालुक्यातील व परिसरातील अनेक गावाचे नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये