शेतकऱ्यांसाठी डॉ.अभ्युदय मेघे यांचा मदतीचा हात
हिवरा,बोरखेडी येथील शेतकऱ्याला केली मदत
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक शेत पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहणी दौऱ्यासाठी डॉ.अभ्युदय मेघे व त्यांचे सहकारी सेलू तालुक्यातील बोरखेडे येथील प्रदीप गडकरी यांचा बैल सर्पदंशाने मरण पावला.
यावेळी मेघे यांनी पशू विमा मिळवून देण्यासाठी वर्धा सोशल फोरमच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ग्वाही शेतकरी प्रदीप गडकरी यांना दिले. तसेच यावेळी शेतकऱ्याला मदत देखील मेघे यांनी केले.
हिवरा येथील शेतकरी गणेश मेश्राम यांची देखील भेट घेतली. सर्पदंशाने त्यांचा बैलाचा मृत्यूमुखी पडला. यावेळी त्यांना देखील मदत मेघे यांनी यावेळी केली. भविष्यात शेतकऱ्यांसाठी जे काय शक्य होईल ते नक्कीच मी करीन अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी शेतकरी गणेश मसराम यांना दिले.
यावेळी गावातील शेतकरी हरीश परिसे, गौरव तलवेकर नरेश चापडे,अतुल भांते, रामू वैरागडे,अनिल उईके, पद्माकर, समीर खोबे, सचिन भांडेकर, अनुराग खोबे रवींद्र शेळके, गजानन कोल्हे,गडकरी,सुशांत वानखेडे, प्रफुल वैरागडे त्यांच्यासोबत उपस्थित होते.