ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मंगेश पोटवार

मुल : तालुक्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांना मोट्या प्रमाणात नुकसानीला सामोर जावे लागले आहे.यात नदिकाठावरील शेतकऱ्याचे रोवलेले रोवणे,परे वाहून गेले असून कापूस,सोयाबीन, भाजीपाला लागवडीचे क्षेत्राची सुद्धा न भरून निघणारी नुकसान झाली आहे.अनेक शेतकऱ्याचे अति पावसामुळे बांध सुद्धा वाहून गेले.त्यामुळे मूल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे(अजित पवार गट) मुल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी तहसीलदार मृदुला मोरे यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे मागणी केली आहे.

 मागील दोन दिवसात मूल तालुक्यात पावसाने थैमान घातले.मागील आठ वर्षाच्या बाद केवळ १२ तासात मूल शहरात २३७ मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्यातही पावसाची हीच परिस्थिती होती.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या घरात साठवून ठेवलेल्या शेतीउपयोगी साहित्याची पुराच्या पाण्यामुळे मोठी नासधूस झाली असून बऱ्याच शेतकऱ्याचे साहित्य आणि खते पुराच्या पाण्यात वाहून गेले.तर दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने २१९ घरांची व ६ गोठ्यांची पडझड झाली असून १ हजार २१४ नागरिकांच्या घरात पाणी घुसले.त्यामुळे घरटी जीवणापयोगी साहित्याची मोठी हानी झाली असून लाखो रुपयाची विद्युत उपकरणे खराब झाली आहे.त्यामुळे मुलं तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कापूस, सोयाबीन,धान,भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी,शेतीउपयोगी साहित्याची झालेली नुकसानीचे तात्काळ पचनामे करून त्यांना झालेल्या वस्तूनिहाय नुकसानीची मदत जाहीर करावी.50% क्षतीग्रस्त झालेल्या घरांना तात्काळ विशेष बाब म्हणून घरकुल मजूर करावे.यात शहरातील नागरिकांचा जागेच्या पट्याचा मोठा जठील प्रश्न असल्यामुळे विशेष बाब म्हणून त्यातून त्यांना सूट देत घरकुल योजनेचा लाभ द्यावा.

पावसाचे पाणी घरात शिरून झालेल्या नुकसानीची मदत तात्काळ सबधित कुटूंबाला देण्यात यावी.मागील वर्षी पीकविमा काढून सुद्धा अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना नुकसानीचा लाभ देण्याचे निर्देश सबधित विमा कंपनीला द्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.यावेळी शहर अध्यक्ष आकाश येसनकर,युवक तालुका अध्यक्ष रोहित कामडे,महिला तालुका अध्यक्ष संगीताताई गेडाम,महेंद्र कोडापे,रजत कुकडे, गोलु दहिवले, रितिक शेंडे, साहिल मेश्राम, चेतन दहिवले, संकेत रामटेके, मालाताई शेंडे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये