अजित दादाच्या वाढदिवसानिमीत्य राष्ट्रवादी पक्षाकडून रुग्णाना फळ वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास कार्यक्रमानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन कोरपणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वृक्ष लागवड त्याचबरोबर विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करून लाभ देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय कोरपना येथील रुग्णांना फळ वितरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष धनराज जीवने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सोहेल आबिद अलीआदित्य मासी कर मोहब्बत खान पठाण शहबाज अली नादिर कादरी रोशन बुरेवार इत्यादी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरपणा तालुक्यातील ६४ बुथवरवृक्ष लागवड कार्यक्रमघेण्यात आला असून 22 जुलैपासून 31 जुलै पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सहसचिव सय्यद आबिद अलीयांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम राबविण्याचे नियोजन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष नादीर कादरी यांनी दिली