ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सततच्या पावसामुळे दीक्षाभूमी वरील खड्ड्यांमध्ये तुडुंब पाणी

दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन समिती कडून खड्डे बुजविण्याची सतत मागणी ; मात्र, प्रशासन दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगचा मुद्द्यावर आताच काही दिवस आधी झालेल्या जनाक्रोश आंदोलनानंतर सुद्धा समिती व प्रशासन यांपैकी कोणालाही अजून पर्यंत तरी जाग आलेली नाही आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पार्किंग करिता खोदण्यात आलेले खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात येऊन समतल करण्याकरिता दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन समिती कडून सतत समिती तसेच प्रशासन यांच्याकडे सतत मागणी करण्यात येत आहे. तरीही हे झोपलेले प्रशासन आणि समाजाच्या भावना चा बाजार करणारी समिती मूग गिळून गप्प बसले आहेत.

शनिवार दि २० जुलै २०२४ रोजी झालेल्या सततच्या पावसामुळे दीक्षाभूमी वरील खड्ड्यांमध्ये तुडुंब पाणी भरले. त्यामुळे जवळच काही अंतरावर असलेल्या ऐतिहासिक दीक्षाभूमी स्मारक व बोधिवृक्ष या दोन वास्तूंना पुन्हा धोका निर्माण झाला आहे. पाण्याचा मोठा साठा दोन्हीही खड्ड्यांमध्ये तयार झाल्यामुळे पाणी जमिनीतून झिरपत झिरपत ढाच्यापर्यंत पोहचून पुढे मोठा धोका उद्भवू शकतो .आधीच पार्किंग च्या खोदकामामुळे नुकसान होऊन ढाच्याला तडे गेलेले आहे ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. समाजासाठी या वास्तूंचे असलेले महत्त्व लक्षात घेता समितीने याआधीच खोदकाम थांबवून जमीन समतल करायला पाहिजे होती पण पैष्यांच्या हव्यासापोटी या समिती सदस्यांनी आपली लाज तर विकलीच तर सोबतच समाजाच्या भावनांचा सुधा बाजार केला व पावन दीक्षाभूमी ची जमीन सुद्धा संधीसाधूना मोकळी करून दिली. शेवटी समाजालाच समोर येऊन काम थांबवण्यासाठी भाग पाडाव लागलं. अश्या नालायक समिती सदस्यांना त्यांची लायकी दाखवण्याची वेळ पुन्हा समाजावर आली आहे.

दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये