Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे विशाळगड घटनेचा निषेध 

अन्यायग्रस्त लोकांना भरपाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  कोल्हापूर येथील विशाळगड परिसरातील अतिक्रमणाच्या नावाखाली योजनाबद्ध पद्धतीने विशाळगडावरील जामा मस्जिद आणि दर्गा शरिफवर जमावाने केलेल्या हिंसाचार,जाळपोळ तसेच स्थिनिक लोकाच्या घरावर आत्मघाती हमले,लहान मुले व महिलावर अत्याचार या घटनेचा मुस्लिम बांधवानी जाहीर निषेध केला आहे.

कारण विशाळगड आणि येथील समस्याचे काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून यावर कोणतेही अंतिम निर्णय झालेला नाही अशा परिस्थितीत जमावाला हिंसाचारा साठी प्रोत्साहित करणे त्या परिसरातील विशेषतः मुस्लिम लोकांवर हल्ले करणे त्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे ही घटना पुरोगमी असलेल्या महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणारी असून ही घटना महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक तणाव निर्माण करणारी आहे तरी शासनाने या घटनेची नोंद घेऊन या अत्याचारात सहभागी असलेल्या प्रोत्साहित करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी तसेच विशाळगड जवळ असणाऱ्या गजापुर या मुसलिम वस्तीवर जमावाकडून करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्यातील दोशीवर तत्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे तसेच या नियोजनबध्द पद्धतीने करण्यात आलेल्या विशाळगड मस्जिद मधील व दर्गाशरीफ तसेच गाजपुर गावातील मुस्लिम लोकांवर व त्याच्या मालमत्तेची तोडफोड,जाळपोळ, याची. नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत शासनाकडून तत्काळ देण्यात यावी.

यासाठी गडचांदुर ठाणेदार व कोरपना तहसीलदार यांना निवेदनातून मागणी करण्यात आली यात सर्व पक्षीय मुस्लिम बांधव जुंमा नमाज पठन करून सर्व मुस्लिम बांधव पोलिस स्टेशन ला जाऊन ठाणेदार ला निवेदन देऊन कोरपना येथे तहसीलदार यांना या बाबत निवेदन देण्यात आले. मुख्य भूमिका ए आय एम आय एम च्या नेत्याची होती त्यात तालुका अध्यक्ष अब्दुल हफीज भाई व त्याचे सहकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये