Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड च्या वतीने बैलमपूर रोडच्या दुतर्फा केले वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे सभोतालील गांवातील विकासाकरीता सतत धडपड करीत असते.

आज बैलमपूर रोडच्या दोन्ही बाजूने माणिकगढ च्या सी.एस.आर.अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलेत.

या वृक्षारोपणाला माणिकगढ चे युनिट हेड श्री अतुल कन्सल, उपाध्यक्ष श्री मुकेश गहलोत, इ.आर. हेड श्री नवीन कौशिक, एच. आर. हेड श्री अमित पाठक तसेच बैलमपूर गावचे सरपंच श्री जगदीश किन्नाके आनी उपसरपंच श्री अशोक चांदेकर व पर्यावरण, सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या वृक्षारोपणात नीम व पाम चि एकूण 800 झाडें बैलमपूर रोडच्या दोन्ही बाजूने लावण्यात येत असून ते एकूण 1.5 किलोमीटर पर्यंत करण्यात येत आहेत.

या वृक्षारोपण च्या बोर्ड चे उदघाटन माणिकगडचे सिमेंट चे युनिट हेड श्री अतुल कन्सल यांच्या करकमला द्वारे करण्यात आलेत.

या वृक्षारोपना मुळे पर्यावरण सुरक्षित राहण्यास, ऑक्सिजन पातळी व रोडची शोभा वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन माणिकढचे युनिट हेड श्री अतुल कन्सल यांनी केलेत.

तर उपस्थित सर्वांनी या वृक्षारोपणाची प्रसंशा केलीत तर बैलमपूर चे सरपंच व उपसरपंच यांनी माणिकगढ सिमेंट कंपनीचे मनापासून आभार व्यक्त केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये