Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आय टी पार्क संचालकावर सीबीआय चौकशीनिशी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ! 

खासदार अमर काळे यांनी" युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी!" - महेंद्र मुनेश्वर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिल्ली येथिल विपिन भाटिया (उद्योगपती) यांनी शासनाची झुडपी-चराई गावठाण, एमआयडीसी व वनविभागाच्या हद्दीतील कोट्यवधीची अंदाजे ३५ एकर अधिक जमीन आय टी पार्क च्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करुन बळकावली आहे.आय टी पार्क मध्ये करोडोचा सावळागोंधळ आहे.याकडे वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमर काळे यांनी लक्ष केंद्रित करुन संसदेत आवाज उठवावा व लुटारुंच्या विरोधात सीबीआय चौकशीनिशी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करुन गांधी जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, “असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दिनांक १२ जुलै २०२४ रोजी वर्धा ते सेवाग्राम मुख्य मार्गाला लागुन असलेल्या मौजा बरबडी एमआयडीसीतील खंडर पडलेल्या आय टी पार्क परिसराची वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमर काळे यांनी नुकतीच पाहणी केली व बैठक घेतली.त्यावेळी विदर्भ रिपाइं (ए) नेते महेंद्र मुनेश्वर बैठकीला उपस्थित होते.मुनेश्वर यांनी आय टी पार्क चे संचालक भाटिया यांचा काळाबाजार खासदार अमर काळे यांचे पुढे बैठकीत उघड केला.

महात्मा गांधी यांची बापू कुटी असलेल्या (सेवाग्राम आश्रम परिसरात) आय टी पार्क चे नावाने गैरव्यवसाय करणाऱ्या अशा भ्रष्ट उद्योगपतीला कदापी माफी मिळू नये.अशीही स्पष्ट भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेशाध्यक्ष मुनेश्वर यांनी खासदार अमर काळे यांचेशी संवाद करतांना निर्भिडपने मांडली.

महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत आयटी पार्क हा विकसित झालाच पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत.जेणेकरून जिल्ह्यातील शिक्षण घेतलेल्या युवकांना वेगवेगळ्या माध्यमातून तिथे रोजगाराची संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होती परंतु संचालक विपीन भाटिया यांच्या काळ्याबाजारामुळे हा आय टी पार्क दहा वर्षापासून पुर्णतः खंडर झाला आहे.सदरहू आय टी पार्क ची जागा मौजा बरबडी ग्रामपंचायत हद्दीत आहे.ही जागा उद्योगपती भाटिया यांनी गैरप्रकारे हडपली आहे.आय टी पार्क ची जमीन ही गुरे ढोरे चराई साठी बरबडी ग्रामपंचायत कार्यालयाकडे आजही राखीव आहे.आय टी पार्कच्या व्यवस्थापनाला बांधकामासाठी कुठलीही रितसर परवानगी ग्रामपंचायत बरबडी व जिल्हाधिकारी कार्यालया कडून मिळालेली नाही.त्यामुळे आय टी पार्कचे संचालकावर सीबीआय चौकशीनिशी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.

वर्धा जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील युवकांना पुणे,मुंबई,बेंगलोर,सुरत अशा ठिकाणी नौकरी व रोजगारासाठी जायची गरज भासनार नाही हि जाणिव उराशी बाळगुन खासदार अमर काळे यांनी आय टी पार्क विकसित करावा असेही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर हे खासदार अमर काळे यांचेशी निर्भिडपणे बैठकीत चर्चा करताना म्हणाले.

              महेंद्र मुनेश्वर,वर्धा

अध्यक्ष: विदर्भ प्रदेशाध्यक्ष रिपाइं (ए)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये