ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हयातील सर्व नागरीकांसाठी ‘ई तकार निवारण दिन’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जिल्हयातील नागरिकांना त्यांचे तकारीच्या अनुषंगाने निराकरणासाठी मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांना भेटण्याकरीता दुर अंतरावरून पोलीस अधीक्षक कार्यालयात यावे लागते त्यात सामान्य नागरीकांचा अमुल्य वेळ वाया जात असुन सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने, सर्व सामान्य नागरीकांच्या तक्रारींची वेळीच निरसन व्हावे याकरीता मा. श्री. नूरूल हसन पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे संकल्पनेतुन वर्धा जिल्हयातील सर्व नागरीकांसाठी दिनांक ०६/०७/२०२४ चे ११.०० वाजता ‘ई तकार निवारण दिन’ राबविण्यात येत असुन तक्रारदाराशी मा. पोलीस अधीक्षक, वर्धा हे स्वतः ऑनलाईन पध्दतीने (व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे) संवाद साधणार आहेत.

सदर दिवशी जिल्हयातील सर्व नागरिकांसाठी त्यांचे जवळचे पोलीस स्टेशनला ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सची व्यवस्था करण्यात येणार असुन तकार निवारण दिनी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार व इतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर राहणार आहे.

तरी वर्धा जिल्हयातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी दिनांक ०६/०७/२०२४ चे ११.०० वाजता त्यांचे संबंधीत पोलीस स्टेशनला स्वतः हजर राहुन मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचेशी संवाद साधुन आपल्या तक्रारीचे निराकरण करावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये