ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांची अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई

पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) हद्दीत 610 ग्रॅम वजनाचा गांजा (अंमली पदार्थ) जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       दिनांक 03/07/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) हद्दीत अवैद्य धंदयावर कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून यातील आरोपी अजिज गुलाब शहा, वय 48 वर्ष, रा. सिंदी (रेल्वे) जि. वर्धा यांचेवर एन.डी.पी.एस कायद्यान्वये रेड केला असता अजिज शाहा, रा.सिंदी रेल्वे याच्या ताब्यातून राहत्या घरी अवैद्यरित्या गांजा (अंमली पदार्थ) 610 ग्रॅम, गांजा (अंमली पदार्थ) मोजण्याचा एक इलेक्ट्रिक वजन काटा व एक अँड्रॉइड मोबाईल असा एकूण जू.किं. 23,200/-रू चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला.

आरोपीला जप्त गांजा (अंमली पदार्थ) बाबत विचारपूस केली असता त्याने नागपुर येथील एका व्यक्तीने पंधरा दिवसांपूर्वी आणून दिल्याचे सांगितले आहे. दोन्ही आरोपी विरुद्ध पो.स्टे. सिंदी रेल्वे येथे अप. क्र. 201/2024 कलम 8(क), 20(ब) ii(अ), 29 NDPS ऍक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. सिंदी रेल्वे करीत आहे.

        सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, महादेव सानप, पवन पन्नासे, रामकिसन ईप्पर, मनीष कांबळे, अरविंद इंगोले, गजानन दरणे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये