ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन स्तरावर नविन कायदे अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 01/07/2024 लागु झालेले नविन कायदे संबंधाने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिक्षक कार्यालय येथे नविन कायदे अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.

सदर कार्यक्रमा करिता जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातुन प्रतिष्टीत नागरिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या लोकांना बोलविण्यात आले होते. मा. पोलीस अधिक्षक वर्धा व मा. अपर पोलीस अधिक्षक वर्धा यांनी नविन कायदे अंलबजावणी संबंधी उपस्थित लोकांना माहीती दिली. तसेच पो.नि. पांडे आर्थीक गुन्हे शाखा वर्धा व स.पो.नि. भोयर सायबर शाखा यांनी नविन व जुन्या कायद्याची तुलनात्मक माहीती उपस्थित नागरिकांना दिली.

जिल्ह्यातील 19 पोलीस स्टेशन अंतर्गत देखील प्रत्येक ठाणेदार यांनी गावामध्ये तसेच शाळा कॉलेजमध्ये जावुन नविन कायदे अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रम राबविला व नविन व जुन्या कायद्याची तुलनात्मक माहीती विद्यार्थ्यांना तसेच स्थानिक लोकांना दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये