ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकारांच्या समस्या,उद्योगवाढ आणि विमानतळाचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करू! – खासदार अनुपभाऊ धोत्रे

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन व जिजाऊ पुण्यतिथी कार्यक्रमात खासदार धोत्रे व प्रकाश पोहरे सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

राजमाता जिजाऊराजे आणि महापुरुषांना अभिवादन

 देशात नामवंत उद्योजकांची नावं असली तरी त्या दिशेने अकोल्यातील युवकांनाही पुढे जाता यावं यासाठी उद्योग वाढ,अकोला विमानतळाचा प्रश्न आणि रेल्वे प्रवास सवलतीसह पत्रकारांच्या ईतर समस्या सोडविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू असे अभिवचन युवा खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी दिले.

लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या भेदातित समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या विचारमंथन तथा राष्ट्रमाता जिजाऊराजे पुण्यतिथी उत्सव व सन्मान समारंभात ते प्रमुख अतिथी तथा सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तर पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर) केंद्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,केंद्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,मार्गदर्शक पदाधिकारी पुष्पराज गावंडे यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी खा.अनुप धोत्रे यांना संघटनेचे खास सन्मानपत्र,ग्रामगीता,शाल व पुष्पगुच्छ तर मा..प्रकाश पोहरे यांना शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.त्यांनी विदर्भातील बंद पडलेले उद्योगधंदे,शेतीमुळे शेतकरी आणि बेरोजगारीमुळे तरूणांच्या झालेल्या विदारक परिस्थितीवर प्रकाश टाकला.याप्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ,लोकस्वातंत्र्य अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबांना हारार्पण करून वंदन,अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,आपत्तीग्रस्त व बळी गेलेले शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

        प्रास्ताविक भाषणातून संघटना अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या औरंगाबाद,श्रीगोंदा,पुणे,पंढरपूर देगलूर,नांदेड असा २००० कि.मी.चा झालेल्या दौऱ्यात मिळालेल्या स्वागतपूर्ण प्रतिसादाचे कथन केले.महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि काही गावात लोकस्वातंत्र्याचे विस्तारीकरण आणि पत्रकार कल्याण उपक्रमांसोबतच मोतिबिंदू,आरोग्य,शिक्षण,मन:स्वास्थ,निराधार,वंचित मदत कार्याच्या ३५ महिन्यांपासून अव्याहत सुरू असलेल्या अकोला आणि ईतर जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमांची माहिती.लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघ या नव्या कक्षाच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी संजय कृ.देशमुख कंझारेकर यांच्या नावाची घोषणा करून प्रकाश पोहरे यांचे हस्ते त्यांना नियुक्तीपत्र व आय कार्ड प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रदिप खाडे,राजेन्द्र देशमुख,पुष्पराज गावंडे यांनी मनोगते व्यक्त केली.

           या कार्यक्रमाला केंद्रीय पदाधिकारी अंबादास तल्हार,संदिप देशमुख,विभागीय पदाधिकारी, डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे, प्रा.राजाभाऊ देशमुख,के.व्ही.देशमुख,शामराव देशमुख,न्यायाधिश नितीनजी अग्रवाल,अॕड नितीन धुत,विजयराव बाहकर,ज्येष्ठ पत्रकार दिपक देशपांडे,जिल्हा बॕंकेचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत उकंडे,नानासाहेब देशमुख,प्रा.विजय काटे,एस.ए.तिडके,धारेराव देशमुख,वसंतराव देशमुख,अॕड.संकेत देशमुख,संजयबाप्पू देशमुख,कंझारेकर,सुरेश भारती,प्रा.मंदार देशमुख,अनंतराव देशमुख,मनोहर मोहोड,दिलीप नवले,सौ.दिपाली बाहेकर,के.एम.देशमुख,कैलास टकोरे,गौरव देशमुख,प्रशांत देशमुख,गणेश मुळे, डॉ.अशोक सिरसाट,प्रा.सुरेश कुलकर्णी, राजाभाऊ देशमुख पि‌.एन जामोदे,सतिश देशमुख‌ (विश्वप्रभात) गजानन चव्हाण,शिवचरण डोंगरे, गजानन मुऱ्हे, राघव टोले,उस्मान परसुवाले,

        कार्यक्रमाचे संचलन लोकस्वातंत्र्य जिल्हा पदाधिकारी सौ.दिपाली बाहेकर तर आभारप्रदर्शन मार्गदर्शक पदाधिकारी विजयराव बाहकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये