ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात गांजा घेवुन येणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळुन त्याचे ताब्यातुन १०२ किलो ३६० ग्रॅम गांजा केला जप्त

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथक दिनांक ०१/०७/२०२४ रोजी पो.स्टे. गिरड परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करणे करीता पो. स्टाफसह पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, “एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर चारचाकी कार क्रमांक एम.एच.-३१/ई.ए.-१९७९ यामध्ये काही इसम गांजा नावाचा अंमली पदार्थ घेवुन उमरेड, जिल्हा नागपूर कडुन सिर्सी मार्गे गिरड कडे घेवुन येत आहे.” अशा माहिती वरुन सिर्सी ते गिरड रोडवर जिल्हा नागपूर कडुन गिरडकडे येणाऱ्या मेन रोडवर स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील अंमलदारांनी झिकॉक पध्दतीने बॅरीगेटींगद्वारे नाकेबंदी करुन थांबलो काही वेळात खबरे प्रमाणे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर फोर व्हिलर कार क्रमांक एम.एच.-३१/ ई.ए.-१९७९ ही दुरुनच येतांना दिसली ती खबरे प्रमाणे असल्याची खात्री पटल्याने सोबत असलेल्या पो. स्टाफचे मदतीने हाताद्वारे थांबण्याचा इशारा दिला असता सदर वाहनाचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन पळुन जाण्याचे उद्देशाने वाहनाचा वेग वाढवुन जागेवर युटर्न मारुन पळुन जात असतांना मोठ्या शिताफीने पकडुन पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर चारचाकी कार क्रमांक एम.एच.-३१/ई.ए.-१९७९ चे चालकास त्याचे नाव, गाव, पत्ता विचारले असता त्याचे नाव – सुरज राजकुमार वासेकर, वय २८ वर्ष, रा. संत तुकडोजी वार्ड, संबोधी नगर, कलोडे मंगल कार्यालयाचे मागे, हिंगणघाट, ता. हिंगणघाट, जि. वर्धा असे सांगीतले. पंचासमक्ष त्याची व त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर चारचाकी कार क्रमांक एम.एच.-३१/ई.ए.-१९७९ झडती घेतली असता आरोपीचे ताब्यातील गाडीचे डिक्की मध्ये वेगवेगळया लहान आकाराच्या पन्नीत ब्राऊन रंगाचे प्लॉस्टिक टेपने गुंडाळुन तयार केलेल्या एकुण ५० पॉकेट मध्ये एकुण १०२ किलो ३६० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ किमंत २०,४७,२००/- रु. व एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर चारचाकी कार क्रमांक एम.एच.-३१/ई.ए.-१९७९, किमंत ५,००,०००/- रु. व एक अॅन्ड्रॉईड मोबाईल किमंत १०,०००/- रु. असा एकुण किंमत २५,५७,२००/- रू चा माल सदर आरोपीचे ताब्यावर मौक्यावर जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपीस मिळुन आलेल्या ‘गांजा’ अंमली पदार्थ त्यांने कोणा कडून आणला? या बाबत पंचासमक्ष विचारपूस केली असता त्यांने सांगीतले की, सदर माल हा आशिष हाडके, रा. कडाजना, ता. हिंगणघाट, जि. वर्धा व अस्मीत भगत, रा. सेवाग्राम याचा असल्याचे सांगीतले वरून सदर तिन्ही आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन, गिरड येथे गुन्हा नोंद करून तपासावर आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक संतोष दरेकर, संदीप गाडे, पोउपनी, उमाकांत राठोड, अमोल लगड व पोलीस अंमलदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, संजय बोगा, यशवंत गोल्हर, प्रमोद पिसे, रितेश शर्मा, पवन पन्नासे, महादेव सानप, रामकिसन इप्पर, मनिष कांबळे, प्रदिप वाघ, राकेश आष्टनकर, विकास अवचट, अरविंद इंगोले, अभिषेक नाईक, विनोद कापसे, अखील इंगळे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये