ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती तस्करी करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई

चिरादेवी- कोची रोडवरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

अवैध रेती  तस्करी करणाऱ्या तीन ट्रॅक्टर वर भद्रावती महसूल विभागाने कारवाई करीत सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले आहे. सदर कारवाई महसूल विभागाच्या गौण खनिज पथकातर्फे दि. २२ रोज शनिवारला पहाटे तीन वाजताच्या सुमारास चिरादेवी – कोची रोडवर करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाद्वारे पहाटेच्या वेळेस घटनास्थळाजवळ सापळा लावण्यात आला.

त्यानंतर या तिन्ही ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली व ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर तिनही ट्रॅक्टरवर नंबर नसल्याचे सांगण्यात आले. सदर ट्रॅक्टर अण्णा खुटेमाटे,  देविदास खुटेमाटे व मोहन दर्वे राहणार पिपरी यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले.पुढील कारवाई भद्रावती महसूल विभाग करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये