रामनगर पोलिसांची मोठी कारवाई., एकाला अटक!
नाकाबंदी दरम्यान ६.५९ लाखांच्या मुद्देमालासह चारचाकी आणि विदेशी दारू जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला रामनगर पोलिसांना मोठे यश आले आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकाने १५ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास जुनापाणी चौक पुलाच्या सर्व्हिस रोडवर नाकाबंदी करून एक चारचाकी कार आणि मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारू व बिअरचा साठा जप्त मिळून आल्याने या कारवाईत एकूण ६,५९,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर प्रकाश मांद्रीले (वय २५, रा. स्नेहल नगर, वर्धा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१५ जूनच्या पहाटे रामनगर पोलीस ठाण्याचे दारूबंदी पथक रात्र गस्त घालत असताना, त्यांना गुप्त माहिती मिळाली की एका चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने जुनापाणी चौक पुलाच्या सर्व्हिस रोडवर सापळा रचून नाकाबंदी केली. पहाटे ०३:३० ते ०४:०० वाजताच्या दरम्यान संशयीत कार अडवून झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी, विदेशी दारू आणि बिअरचा साठा मिळून आला. त्यात टैंगो पंच’ देशी दारूच्या ९० ML च्या २०० शिश्या (किंमत २०,००० रुपये), ट्यूबर्ग बिअर (६५० ML) १२ काचेच्या शिश्या (किंमत ५,४०० रुपये) ट्यूबर्ग बिअर कॅन (५०० ML) ७२ डबे (किंमत २८,८०० रुपये), बडवायझर बिअर (६५० ML): १२ काचेच्या शिश्या (किंमत ५,४०० रुपये), चारचाकी वाहनः निळ्या रंगाची मारुती सुझुकी कार (क्र. MH 40 KR 4360) (किंमत ६,००,००० रुपये) एकूण जप्त मुद्देमालः ६,५९,६०० रुपये, या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी मयूर मांद्रीले विरुद्ध अप. क्र. ५७१/२६, कलम ६५(अ) (ई), ७७ (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा, सहकलम ३ (१), १८१, १७७ मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल वर्धा, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे वर्धा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर वर्धा यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे मॅडम आणि स.पो.नि. अंबादास टोपले सर यांच्या निर्देशनाखाली दारूबंदी पथकाचे पोलिस हवालदार अवि. बनसोड, पोलिस शिपाई मनोज भोमले, मुकेश वांदिले, व विकी अणेराव यांनी केली आहे .
(आशिष चिलांगे) सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा.



