ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा तहसीलदारांनी केली रेती जप्त

रेती तस्करी वाल्यांचे धागे दणकले, आणि अंधाराचा फायदा घेत अनेक ठिकाणाची रेती गायब

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : चंद्रपूर जिल्हयात रेती घाट लिलाव प्रक्रिया पार पडली नाही मात्र जिल्हाभर तस्करांनी थैमान घालून महसूल विभाग व पोलीस विभागाला चकमा देत तस्करी केली तर कुठे महसूल पोलीस प्रशासनाशी मधुर संबंध व आर्थिक व्यवहार यामधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरूच होती मात्र जिल्हाधिकारी विनय गौडा सी जी यांनी जिल्ह्यातील रेती तस्करी थांबविण्याच्या उद्‌देशाने जिल्हास्तरावर महसूल परिवहन खनिकर्म पोलीस विभागाची संयुक्त आढावा सभा चेवून प्रशासकीय अधिकाऱ्यानी संवेदनशील रेती तस्करी संबंधात निर्देश दिले कोरपना तालुक्यात कोरपना येथील रेती तस्करांनी राजकीय सत्तेच्या बळावर तेलंगणा राज्यातील पैनगंगा नदीवरून जे.सी.बी हायवा वाहनाने मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करून विक्री केली व यामधून मोठा आर्थिक फायदा घेतला व महसूल विभागाने नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरले पोलीस प्रशासनांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग यांनी या तस्करांचे मुस्के आवरण्यासाठी २ हायवा रेती भरलेले ताब्यात घेवून पोलीस कार्यवाही केली परंतु त्याचा कोणताही परिणाम रेती तस्करावर झाला नाही उलट पावसापूर्वीचे नियोजन म्हणून मोठ्या प्रमाणात रेतीसाठा नगर पंचायतच्या सुरु असलेल्या कामावर सरकारी रस्त्यावर व ओपन स्पेस खुल्या जागेत साठवणूक करण्यात आली होती.

मात्र जिल्हाधिकारी यांच्या संवेदनशिल रेती धोरणाची अंमलबजावणी करा असे बैठकीत निर्देश देताच कोरपनाचे तहसीलदार व्हटकर व महसूल प्रशासन खडबडून जागे झाले व दि. २६/०६/२०२४ रोजी आपल्या ताफ्यासह फेरफटका कोरपना नगरीत मारुन ठीक-ठिकाणी रेतीचे अवैध साठे चुना मारून पंचनामे केले व बेवारस रस्त्यावर पडलेली रेतीचे ढिगारे उचल करून तहसील कार्यालयात जमा केले मात्र अनेक वाडांतील रेती सूर्यास्त झाल्याने उचल करता आली नाही मात्र त्या ढिगाऱ्यावर रेती तस्करांनी रात्रीच्या अंधारात जे.सी.बी व ट्रकटरच्या सहाय्याने रेती साफ करून सोयीच्या ठिकाणी साठवणूक केली आहे मात्र हे सर्व घडत असतांना संपर्क साधण्याचा प्रयत्न काही पत्रकारांनी केला असता तहसीलदार, तलाठी, ठाणेदार, यांचे फोन बंद असल्याने संपर्क होवू शकला नाही मात्र हि बाब कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली ज्यादा आर्थिक फायदा करून घेण्याच्या उ‌द्देशाने रेती तस्करांनी कोरपना शहरासह चनई, मांडवा, जेवरा अशा ठिकाणी अवैध रेती साठवून ठेवल्याची चर्चा आहे.

  राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी जी.आर.आय.एल कॉम्प खिडर्डी येथे सुद्धा कोलगाव, साखरा, मुठरा व तेलंगना राज्यातील अवैध उत्खनन केलेली रेती वाहतूक करून खिर्डी कॅम्प येथे साठवलेले रेती साठ्याची चौकशी तहसीलदार तथा महसूल विभाग करणार का? अशी चर्चा गावकऱ्यात सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये